तेल्हारा: ब्राह्मण समाजाचे कुलदैवत भगवान परशुराम यांच्या अवतरण दिनानिमित्त रविवार 26 एप्रिल रोजी बहुभाषिक ब्राह्मण समाज तेल्हारा च्या वतीने भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे घरोघर सामाजिक दुरावा ठेवून विधिवत पूजन कपूर प्रज्वलन आरती व विनम्रपणे वंदन करण्यात आले. याच वेळी घरोघर पूर्वजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यात आला व प्रसाद वितरण करण्यात आले.
कोरोना विषाणूच्या प्रकोपाने लाँकडाऊन असल्याने यावर्षी भगवान परशुराम जयंती उत्सव शोभायात्रेला फाटा देण्यात आला. असून बहुभाषिक ब्राह्मण समाज तेल्हारा च्या वतीने शिव भोजन योजनेअंतर्गत गोरगरीब व गरजूंना नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था आसरा माता मंडळ तेल्हारा च्या वतीने परशुराम जयंती च्या संघ्याकाळी मजुरी करण्याकरिता आलेले गरजू लोकांना वाडी रोड बेलखेड रोड साई मंदिर परिसर या ठिकाणी निवास असलेले मजूर, गरजू लोकांना भोजन वितरित करण्यात आले. गरजुना दिल्या जाणाऱ्या अन्नदानाचा आर्थिक भार बहुभाषिक ब्राह्मण समाजाने उचलला आहे. तसेच समाजातील गरजू कुटुंबांना किराणा साहित्यांची यांचे वितरण करण्यात आले. बहुभाषिक ब्राह्मण समाजाच्या वतीने भगवान परशुराम जयंतीनिमित्त राबविण्यात आलेल्या या सेवा उपक्रमाची शहरात प्रसंसा करण्यात येत आहे.
अधिक वाचा: अकोटातील शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टराची गैरहजेरी, रुग्णालय सोडले वाऱ्यावर