तेल्हारा ता २४: तेल्हारा शहरातील सौ विद्याताई सिद्धार्थ शामस्कर ह्या मूळच्या तेल्हारा शहरातील माधव नगरातील तिल रहिवाशी परंतु त्याची वैद्यकीय आरोग्य पर्यवेक्षिका ही सेवा दानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आहे त्यामुळे दैनदिन सेवेवर जाण्यापूर्वी त्यांनी त्यांचा आज वाढदिवस तो गोरगरीब गरजूंना धान्य किट वाटप करून साजरा केला शासनाच्या सोशल डिस्टनसिंग व माक्स वापर करून त्यांनी तेल्हारा येथील इंदिरा नगर येथील
हरूमत खाला,शे उमर,जरीना बी,काजीम शेख,सत्यभामा कुकडे,देविदास इंगळे, सतिष लोणकर, रमेश चव्हाण,दौलत पोहरकार, गुफाबाई जाधव,बाळू वानखडे,मंगेश पाखरे,सोनम गुणसारिया,गीताबाई अंजनकर
या १० कुटुंबाना निवडले त्यात प्रत्येकी १० किलो गहू १ किलो तांदूळ १ तुरडाळ,१ किलो साखर,१ किलो तेल पाकीट,सह आदि जीवआवश्यक वस्तूची पैक किट चा वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला यावेळी त्याचे पती सिद्धार्थ शामस्कर सर,मुलगा निशांत शामस्कर उपस्थित होते त्यांनी ते गरजूंना जीवनावश्यक वस्तू वाटून लगेच आपली वैद्यकीय सेवा असलेल्या दानापूर पी एच सी ला सेवेत हजर झाल्या त्यामुळे एकीकडे वैद्यकीय सेवा तर दुसरीकडे जनसेवा तेही सध्याच्या कोरोना संकटात सम्पूर्ण जग हादरलेले आहे लॉकडाऊन मुळे ज्याचे हाताचे काम गेले जे आताच घरीच बसून आहेत त्यामुळे ज्याचे पोट दैनंदिन मजुरी वर आहे अश्याना मद्दत करणे हेच खरे मानवी कल्याणकारी कार्य मानवी सेवा आहे जे गाडगे महाराज यांनि आपणास सांगितले आहे की भूकलेल्याना अन्न दयावे तहानलेल्या ना पाणी द्यावे हीच खरी ईश्वर सेवा आहे ह्याच महापुरुषाचा आदर्श घेऊन आपण आपले कार्य करावे यातून माणसाला आत्मिक समाधान झाल्याचे त्यांनी प्रांजळ कबुली दिली त्यामुळे त्यांनी ही सेवा कार्य पार पाडले आहे त्याच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे