अकोला दि. 9 : आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीत (आरटीपीसीआर) 87 जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 1 व खाजगी 0)1+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 1.
आरटीपीसीआर ‘एक’
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात एका पुरुष रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. हा पुरुष पातूर तालुक्यातील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून मिळाली.
सक्रिय रुग्ण ‘नऊ’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66210(50077+15142+991) आहे. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात नऊ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून देण्यात आली आहे.