अकोला,दि.3: जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यामुळे चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. 27 डिसेंबर ते 2 जानेवारीदरम्यान 1 हजार 441 कोविड चाचण्या करण्यात आल्या. जिल्ह्यात आजमितीला एकूण चार सक्रिय रूग्ण आहेत. त्यात दोन रूग्ण पंचगव्हाण व एक मोर्शी (अमरावती) येथे आहे. सौम्य लक्षणांमुळे तिन्ही रूग्ण गृहविलगीकरणात आहेत. मंगरूळपीर तालुक्यातील एका व्यक्तीला कोविड-१९ ची बाधा झाल्याचे आढळले असून, ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.
नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, हातांची स्वच्छता, जोखमीच्या व्यक्तींनी गर्दीत न जाणे, कुठलीही सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी झाल्यास त्वरित नजिकच्या संस्थेत तपासणी करून घेणे आदी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.