घोडेगाव(प्रा.विकास दामोदर)- तेल्हारा तालुक्यातील घोडेगाव येथील दिनेश गणेश दामोदर (वय 33 वर्ष )आज खालील वेग इस्माईल वेग यांच्या शेतात सोयाबीन सोंगनी करण्यासाठी गेले असता सर्पदंशाने मृत्यू झाला.
यावर्षी सतत पावसामुळे शेतकरी व शेतमजूर यांच्यावर फार वाईट परिस्थिती आली आहे. त्यातच बरेच दिवसांपासून हाताला कामधंदा नसल्यामुळे अक्षरशः शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली होती त्यातच पाण्याने थोडी सवड दिल्यामुळे मजूर काम करण्यासाठी धडपड करत आहे. अशातच गावातील काही मजुरांसह दिनेश हा सोंगनीला गेला असता त्यात त्या सोयाबीन मध्ये वाढलेले गवत पोटाच्या आगिपुढे काही एक न पाहता कामात व्यस्त असतांना नेमका साप केव्हा चावला हे देखील या मजूरास माहीत नाही, पण जेव्हा विष पूर्ण अंगात भिनले तेव्हा त्यास काही दिसेनासे झाले, गळा भरून येवू लागला त्याने सोबत्याना सांगितले व लगेच धावाधाव सुरू झाली कसंबस दवाखान्यात आणले परंतु डॉ. नी त्यास मृत घोषित केले.
सदर शेतमजूर हा भूमिहीन असून त्यास चार लहान – लहान मुली आहेत पत्नी तथा वृद्ध आई वडील या सर्वांचा पोशिंदा गेल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अत्यंत मनमिळवू, सामजिक कार्यात सदा अग्रेसर असणारा दिनेश गेल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली.