अकोला(प्रतिनिधी)- सध्या महाराष्ट्रात परतीच्या पावसाने प्रचंड थैमान घातलेले आहे यामुळे ग्रामीण व शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. समाजातील प्रत्येक घटक या अतिवृष्टीमुळे बाधित झालेला आहे इतकेच नव्हे तर शेतकरीसुद्धा आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे शिकणारा विद्यार्थी हासुद्धा या संकटाला तोंड देत आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी अभाविप अकोला शाखेच्या वतीने तहसीलदार जिल्हाधिकारी भेटून महाराष्ट्र शासनाकडे विनंती व निवेदन करते आहे. यावर तहसीलदारांनी/जिल्हाधिकारी यांनी अभाविप ची मागणी लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाला कळवावी व निर्णय घ्यावेत. यावेळी अतिवृष्टीमुळे कुठलाही विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचीत राहू नये याची दखल घेण्यात यावी.
खालील मागण्या अभाविप ने केल्या आहेत
१ ) महाराष्ट्रात सर्व दूर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे तरी.
२)या वर्षी विद्यार्थ्यांची सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे
बस पास मोफत करण्यात यावे.
३) शहराच्या ठिकाणी निशुल्क मेस ची व्यवस्था करण्यात यावी.
४)महाविद्यालयातर्फे कुठल्याही प्रकाचे शुल्क भरण्याची सक्ती करण्यात येणार नाही यासाठी च्या सूचना महाविद्यालयांना देण्यात याव्या.
५) विद्यापीठातील वसतिगृहाचे शुल्क माफ करण्यात यावे.
वरील सर्व मागण्यामध्ये महाराष्ट्र शासनाने स्वतः जातीने व गांभीर्यपूर्वक लक्ष घालून निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी अभाविप प्रदेश सहमंत्री श्री खुशाल राठौड,
जिल्हा संयोजक श्री मनीष फाटे,
नगर मंत्री श्री अभिषेक देवर,
महानगर संघटन मंत्री श्री शक्ति केराम,मीडिया प्रभारी श्री गुलशन तिवारी,महाविद्यालय प्रमुख श्री शुभम कजे,कार्तिक काले व गौरव धोत्रे उपस्थित होते.









