तेल्हारा- मुस्लिम समाज च्या वतीने तेल्हारा येथे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त “ईद ए मिलाद उल्हासात साजरी करण्यात आली ,या निमित्ताने रविवारी सकाळी मिरवणूक काढण्यात आली ,शहराच्या मुख्य मार्ग वरून निघालेल्या या मिरवणुकी मध्ये मुस्लिम समाजातील सुन्नी पंथाचे तकीया मस्जिद चे हाफिज अरकान यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मिरवणूक मध्ये मुस्लिम समाजातील प्रत्येक जण, लहान मुले ,जेष्ठ नागरिक सर्व अत्यंत शिस्तीने सहभागी झाले यावेळी तकीया मस्जिद च्या वतीने पवित्र मक्का मदिना, सब्ज गुंबद, खानये काबा याची तयार केलेली प्रतिकृती ने समस्त जनतेला आकर्षित केले होते, मिरवणूक च्या मार्गावर विविध ठीक ठिकाणी विविध संघटना, पक्ष, यांच्या वतीने नाश्ता, चहा, पाणी ची व्यवस्था करण्यात आली होती, सरकार की आमद मरहबा, दिलदार की आमद मरहबा चे घोष वाक्य मिरवणुकीत लहान चिमुकल्या मुलाकडून दुमदुमत होते, शेवटी तकीया मधील हजरत शाह हाजी कासम र अ यांच्या दर्गा वर या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला, समारोप नंतर माजी नगर सेवक अन्वर शाह बाबू, अजहर शाह सर, ऍड अख्तर शाह, अफसर शाह वायरमण यांच्या वतीने महाप्रसाद(भोजन)ची व्यवस्था करण्यात आली होती या मिरवणुकीत नगर सेवक गणी शाह मास्टर, चांद शाह रहेमान शाह, सुलतान शाह पहेलवान, नूर शाह बाबा, अजहर मास्टर, साबीर सेट, राजीक शाह, सलीम शाह पहेलवान, इर्शाद कादरी, अमीन शाह, युसूफ शाह, आबीद शाह, सिलेमान शाह, जमील शाह, जब्बार शाह, शब्बीर शाह, मुन्नावर कादरी, लुकमान शाह, इरफान दादा, इम्रान बावा, जहिर बापू, जावेद शाह सहित मुस्लिम समाजातील प्रत्येक व्यक्ती हजर होती.यावेळी विकास देवरे साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवला.