अकोला(प्रतिनिधी)- स्थानिक खडकी येथे श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालयात समाजकार्याचे शिक्षण घेत असलेले सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत तळोकार यांनी परिस संस्थेची स्थापना करून एक सामाजिक कार्याची आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.दिव्यांग आर्ट गॅलरी अकोला चे प्रा विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी दिव्यांग बांधवांसाठी विविध सामाजिक उपक्रमात आपला महत्वपूर्ण सहभाग नोंदवला. दिव्यांग मतदारांची टक्केवारी वाढावी व मतदारांची अनास्था दूर होऊन मतदान जास्तीत जास्त व्हावे यासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी श्री जितेंद्र पापळकर,व उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री राजेश खवले सर यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात आलेले मतदान साक्षरता अभियान प्रा विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण जिल्हाभर उत्कृष्टपणे राबविले.
जिल्हा प्रशासन,दिव्यांग आर्ट गॅलरी अकोला,परिस बहुउद्देशीय संस्था खडकी व विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हे अभियान राबविले गेले.त्याचा परिणाम म्हणजे अकोला जिल्ह्यात दिव्यांग मतदारांची टक्केवारी 92 टक्के पर्यंत वाढली.ही टक्केवारी विभागात सर्वाधिक आहे.श्रीकांत तळोकार यांनी आपले राष्ट्रीय कार्य कृतीत करण्यासाठी मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदार,वयोवृद्ध मतदार,प्रसुधा महिला मतदारांना सहा अंबुलन्स च्या मदतीने मतदान केंद्रापर्यंत नेऊन मतदान झाल्यानंतर घरापर्यंत नेण्याचे मोलाचे कार्य केले.श्रीकांत तळोकार यांनी दिलेल्या या राष्ट्रीय योगदानाबद्दल नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे माननीय जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी श्री जितेंद्र पापळकर यांनी प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन श्रीकांत तळोकार यांचा गौरव केला.यावेळी मा. आयुष प्रसाद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला,निवासी उपजिल्हाधिकारी श्री.संजय खडसे,सहाय्यक नोडल अधिकारी श्री प्रकाश अंधारे,प्रा विशाल कोरडे संस्थापक अध्यक्ष दिव्यांग आर्ट गॅलरी, व विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









