हिवरखेड (प्रतिनिधी)- स्थानिक द टारगेट अकॅडमी हिवरखेड द्वारा स्पर्धा परीक्षा सराव पेपर चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा परीक्षा सराव पेपरचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेंद्र कराळे हे उपस्थित होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये सरपंच सौ अरुणाताई ओंकारे, वंदनाताई वानखडे,मुरलीधर पोके, सुरेश ओंकारे, किरण सेदानी, बागडे सर, प्रा. अक्षय गुप्ता, प्रा.माधव गावंडे, प्रा.अमोल येऊल, पोलीस पाटील प्रकाश गावंडे, सुभाष कवळकर, डॉ. वाजिद अली, घुले सर, अभिजीत ढोकणे, सागर खारोडे, शुभांगी इंगळे इत्यादी विचारपिठावर उपस्थित होते. सर्वप्रथम महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी द टारगेट अकॅडमी च्या वतीने मोफत सुरु असलेल्या द टारगेट अभ्यासिकेला 25 हजार रुपयाची स्पर्धा परीक्षा विषयक पुस्तके उपलब्ध केल्या गेली, याचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकामधून गौतम इंगळे सर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी व ग्रामीण भागातून अधिकारी बनावेत, याकरिता द टारगेट अकॅडमी नेहमी तत्पर असल्याचे सांगितले.
त्यानंतर या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणारे कु. पद्मा आनंदा कुऱ्हाडे, श्रीकांत दुधे, स्वप्निल खंडेराव या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले. यामध्ये सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व 3000,2000 व 1000 चे रोख रकमेचे बक्षीस देऊन उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणानुक्रमे पहिल्या 30 विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटपही करण्यात आले, यानंतर किरण सेदानी, योगेश बागडे साहेब , प्रा. गुप्ता सर यांनी द टारगेट अकॅडमीच्या या स्तुत्य उपक्रमास शुभेच्छा दिल्या. शेवटी अध्यक्षीय भाषणातून महेंद्र कराळे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये उतरून स्वतःचे करिअर तर बनवावेचं सोबतच आपल्याला समाजाचे देणे आहे हेही विसरू नये, तसेच समाजोपयोगी कार्यात आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा असे सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन निखिल भड यांनी केले तर आभार हर्षल धुरदेव यांनी मानले. कार्यक्रमासाठी हिवरखेड मधील बहुसंख्य विद्यार्थी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.