अकोट (प्रतिनिधी)- अकोट येथील सरस्वती विद्यालय येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले नितीन शेंगोकार याना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अकोट येथे सत्कार करण्यात आला. यावेळी शुभम साहेबराव बोरोडे व मित्र परिवार तर्फे त्यांच्या निवास स्थानी जाऊन पुष्पगुच्छ देऊन गुण गौरव व सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित प्रा. हर्षल बहादूरे, प्रा. अक्षय काळे, अर्पित बोरोडे, नवनीत दिंडोकार, अक्षय बोरोडे, अनिरुद्ध काळे, सौरभ बोरोडे, सागर दिंडोकार, प्रथमेश बोरोडे, अक्षय डांगरे, वैभव हाडोळे, चैतन्या नाथे, वैभव टेबरें उपस्थित होते.









