बाळापुर (डॉ शेख चांद)- गणेशोत्सवानिमित्त बाळापुर व पातुर तालुक्यातील सर्व गणेशोत्सव मंडळांकरिता शिवसंग्राम प्रदेश उपाध्यक्ष संदीपदादा पाटील यांच्या संकल्पनेतून यावर्षी उत्कृष्ट सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सामाजिक संदेश देणारे देखावे सुद्धा या स्पर्धेत बक्षीस मिळवू शकतात. बाळापुर व पातुर तालुक्यातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी आपल्या सजावटीचे व सामाजिक संदेश देणार्या देखाव्यांचे छायाचित्र दि. 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मंडळाचे नाव व पत्त्यासह व्हाट्सअप क्रमांकावर पाठवायचे आहेत.
छायाचित्र पाठवण्याकरिता बाळापूर तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांकरिता व्हाट्सअँप क्रमांक अमोल ठाकरे 9422808341, जगदीश पाटील 8275311504 तर पातुर तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांकरिता व्हाट्सअँप क्रमांक विजय वाघ 9767447156 असे आहेत. फोटो पाठवितांना केवळ दोन फोटो पाठवावे. एका फोटोमध्ये श्री गणेश मूर्ती सह सजावटीचा देखावा आणि दुसऱ्या फोटोमध्ये मंडळाचे पदाधिकारी असलेला फोटो स्पर्धेकरिता पाठवावा. स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या गणेशोत्सव मंडळांची उत्कृष्ट सजावट निवड करण्याचा अधिकार आयोजन समितीला राहील. बक्षीस वितरण सोहळा दि. 11 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. बाळापुर व पातुर दोन्ही तालुक्यांकरिता स्वतंत्रपणे प्रथम बक्षीस 11001, द्वितीय बक्षीस 7001 व तृतीय बक्षीस 5001 अशा रीतीने देण्यात येतील. तरी बाळापुर व पातुर दोन्ही तालुक्यातील जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांनी या भव्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन स्पर्धेचे आयोजक, शिवसंग्राम प्रदेश उपाध्यक्ष संदीपदादा पाटील यांनी केले आहे.