दानापूर (सुनिलकुमार धुरडे)- अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष कुमार प्रसाद यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्हा भर जिल्हा, पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वच्छता मोहत्सव रथ यात्रेचे आज दानापूर येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
या स्वच्छता रथाचे पाण्याच्या टाकी जवळ दानापूर च्या सरपंच अनुराधा गोयनका,उपसरपंच कैलास पिलातरे , मा. दिपमाला दामधर, ग्रामपंचायत सदस्य निर्मला राऊत, लीला खवले, श्री, फळके साहेब, रमेश भुते, रवींद्र ढाकरे, व बचत गटाच्या महिनी या रथाचे पूजन करून स्वागत केले. गावातून प्रभात फेरी, काढत जण जागृती करण्यात आली. यावेळी लहान मुलींनी वेशभूषा करण्यात आली होती.
या रथ यात्रे सोबत जि. प. व प्राथमिक शाळा मुले व जि. प. कन्या शाळेचे विद्यार्थी, मुख्यधयापक, शिक्षक, शिक्षिका, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष ,व सदस्य उपस्थित होते,ग्राम पंचायत सदस्य पालक, पत्रकार या रथ यात्रेत सहभागी झाले. या रथ यात्रेचे सांगता जिल्हा परिषद शाळा मुले च्या प्रागंनात झाली. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव फडके यांनी आपल्या भाषणात वयक्तिक शौचालय चा वापर करणे, प्लास्टिक बंदी, गावात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी घंटी गाडी, व कार्यक्रमात पाहुन्यांना वृक्ष भेट देऊन सत्कार करणे या बाबत माहिती दिली तसेच गट विकास अधिकारी श्री, चौव्हान, श्री, डहाके याची भाषणे झाली.
तेल्हारा तालुक्याचे प्राण शाहीर लोनाग्रे यांचा स्वच्छता या विषयावर प्रोबोधन पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमला जिल्हा परिषद शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महादेव वानखडे, संजय हागे,गोपाल विखे, महिला बचत गट , अंगणवाडी सेविका, प्रथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी सुमित्रा भिनकरे,केंद्र प्रमुख मिलींद खिराडे, मुख्याध्यापक श्री, पातूर्डे, श्री,सुताडे,व शिक्षक, शिक्षिका गावातील नागरिक, पत्रकार व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन ठोबरे तर आभार संजय हागे यांनी केले.