अकोला : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुडीकेने घेतलेल्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. या परीक्षेत चंद्रपूरच्या बल्लारपूर येथे राहणारा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला आला आहे. त्याला १०० पर्सेंटाइल मिळवले आहेत. या आधीही जेईई मेन परीक्षेत १०० पर्सेंटाइल मिळवून तो देशात १८ वा आला होता. तर महाराष्ट्रात दुसरा आला होता. कार्तिकेयने यावर्षीच इयत्ता १२वीच्या परीक्षेत ९३.७ टक्के गुण मिळविले आहेत.
कार्तिकेय अवघ्या १७ वर्षाचा असून त्याने जेईई अॅडव्हान्स परीक्षेत ३६० पैकी ३३७ गुण मिळविले आहेत. कार्तिकेयचे वडील चंद्रेश गुप्ता पेपर इंडस्ट्रीमध्ये मॅनेजर असून आई पूनम गुप्ता या गृहिणी आहेत. जेईई अॅडव्हान्स परीक्षा २७ मे रोजी झाली होती. या परीक्षेला देशभरातून २.४५ लाखाहून अधिक विद्यार्थी बसले होते. या परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://jeeadv.ac.in/
जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल लागल्यानंतर कार्तिकेयने आनंद व्यक्त केला. निकाल चांगला लागेल हे माहीत होतं. पण देशातून पहिला येईल असं वाटलं नव्हतं, असं सांगतानाच विचारपूर्वक परीक्षेची तयारी केली आणि नियमित क्लासला जाण्याबरोबरच ६ ते ७ तासांचं शेड्यूल तयार करून अभ्यास केल्यानेच हे यश मिळाल्याचं कार्तिकेयनं सांगितलं.
देशातील १० टॉपर
कार्तिकेय गुप्ता (महाराष्ट्र), हिमांशू गौरव सिंह (दिल्ली), अर्चित बुबना (दिल्ली), गिलेला आकाश रेड्डी ( हैदराबाद), बत्तीपति कार्तिकेयन (हैदराबाद), निशांत अभंगी (दिल्ली), कौस्तुभ दिघे (महाराष्ट्र), थिवेश चंद्र एम (हैदराबाद), ध्रृवकुमार गुप्ता (दिल्ली) आणि शबनम सहाय (महाराष्ट्र)
अधिक वाचा : आरोग्यसेवा कोलमडली; मार्डचे ‘कामबंद’ सुरू
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola