बाळापूर( डॉ शेख चांद)– बाळापूर शहरातून वाहणाऱ्या मन आणि महेश नदीच्या संगमा जवळील अशोक नगराच्या पाठीमागील मन नदी पात्रात आज दिनांक 11।4।19 रोजी दुपारी 1 वाजे दरम्यान एक प्रेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांना मिळाली. त्यांनी त्वरित सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव पाटील, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेंद्र जोशी, हर्षल श्रीवास ह्यांना शोध घेण्यास पाठविले असता त्यांना एका प्रेताचे डोके फक्त पाण्यावर तरंगताना दिसले, सदर प्रेत किनाऱ्या पासून दूर असल्याने पुरुष किंवा स्त्री आहे हे समजत नसल्याने त्वरित पोलिसांनी एक पोहणाऱ्या इसमास पाण्यात पाठवून सदर प्रेत किनाऱ्या वर आणण्याची व्यवस्था केली असता ते प्रेत साधारणतः 35 ते 40 वर्ष वयोगटातील पुरुषाचे असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे शरीरावर फक्त पॅन्ट होती व वर अंग उघडे होते, ह्या वेळी बघ्यांची बरीच गर्दी झाली होती, त्यांना प्रेत दाखवून पोलिसांनी ओळख पटविण्याचा प्रयत्न केला परंतु ओळख पटू शकली नाही. त्याचे पॅन्टची झडती घेतली असता त्याचे पॅन्टचे खिशा मध्ये एक रेल्वे चे तिकीट मिळाले पण ते भिजले असल्याने काही समजून येतं नव्हते, त्याला सुकवून पाहणी केली असता ते नागपूर ते शेगावचे कालचे तिकीट असल्याचे आढळून आले.
त्याची पाहणी केली असता तिकिटाचे मागील बाजूस काहीतरी आकडे लिहलेले दिसले परंतु तिकिटाचे दोन तुकडे झाल्याने त्याला जोडून पडताळणी केली असता तो डॉट पेन ने लिहलेला मोबाईल क्रमांक असल्याचे लक्षात आले, बाळापूर पोलिसांनी त्यावर संपर्क करून मृतकाचे वर्णन सांगितले असता सदर प्रेत हे गौरव विनोद गाढवे वय 35 वर्ष राहणार रेशीमबाग चौक, शिरासपेठ नागपूर असून तो दर्शना साठी शेगाव ला काल रात्री रेल्वे ने गेल्याचे त्यांनी सांगितले , व काही किरकोळ भांडण रेल्वे स्टेशन वर झाल्या मुळे त्याला पोलिसांनी चौकशी करून सोडून दिल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले त्याचे आई वडील शेगाव पोलिसांनी बोलविल्या वरून शेगाव ला आले होते पण त्या पूर्वीच पोलिसांनी चौकशी करून त्याला सोडून दिल्याचे सांगितले, त्याचे प्रेताचे शवविच्छेदन केले असता त्याचा मृत्यू हा पाण्यात बुडून झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्याने आत्महत्या केली हे निष्पन्न झाले, पण तो शेगाव वरून बाळापूरला कशाला आला व आत्महत्येचे नेमके कारण काय, किंवा त्याची मानसिक स्थिती बरोबर होती किंवा कसे ह्या बाबत पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव पाटील, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेंद्र जोशी हे पुढील तपास करीत आहेत.
अधिक वाचा : काटेपुर्णा नदीवरील डोहात बुडालेल्या दत्ता ठाकरेला शोधण्यासाठी अद्यापही सर्च ऑपरेशन चालुच
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola