बार्शीटाकळी(प्रतिनिधी)- दोनद ता.बार्शीटाकळी जिल्हा अकोला (पो.स्टे.पिंजर) येथील आसरामाता मंदीरावर बोरगाव मंजु. येथुन रोठाच्या कार्यक्रामासाठी आलेल्या भाविकांपैकी दत्ता ठाकरे (वय अं.35) रा.भोपाळ हे आसरामाता मंदीराला लागुन असलेल्या काटेपुर्णा नदीवरील डोहात बुडाल्याची माहिती दोनद येथील पोलिस पाटील प्रल्हाद खंडारे आणी सागर कावरे यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दीली.
पथक प्रमुख दीपक सदाफळे हे आपल्या टीमसह आपत्कालीन वाहन आणी शोध व बचाव साहीत्य व रेस्कयु बोटसह सर्च ऑपरेशनसाठी घटनास्थळी 3 वाजता पोहचले होते. कालपासून काटेपुर्णा नदीला पाणी सोडलेले असल्याने ही नदी/डोह पुर्णपणे भरलेला असल्याने नदीमध्ये 25-30 फुट खोल पाणी आहे. स्थानिक अमोल खंडारे, सिद्धार्थ खंडारे, निखील प्रभे, प्रशांत खंडारे, आदीत्य खंडारे, दीपक खंडारे, यांनी दुपार पर्यंत शोध घेतला परंतु मिळुन आला नाही. दुपारी 3 तीन वाजतापासुन आम्ही सर्च ऑपरेशन चालु केले. आतापर्यंत ही व्यक्ती सापडली नाही. आंम्ही बुडालेल्या दत्ता ठाकरेला शोधण्यासाठी आज रात्रभर सर्च ऑपरेशन चालुच ठेवणार आहोत. अशी माहिती दीपक सदाफळे यांनी नातेवाईकांना आणी पिंजर पो.ठाण्याचे ठाणेदार नंदकीशोर नागलकर साहेबांना दीली आहे. नदीमध्ये 25-30 फुट खोल पाणी आणी दुर्गादेवी तथा गणेशमुर्तींचे मोठया प्रमाणात फाऊंडेशन आणी निरनिराळे साहित्य असल्याने सर्च ऑपरेशनमध्ये अडथळे निर्माण होत आहेत तरीही आज सर्च लाईट लावुन संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्या सह त्यांचे सहकारी ज्ञानेश्वर म्हसाये, विक्की साटोटे, गोविंदा ढोके, अक्षय डोफे, दिनेश चव्हाण, गोविंद कुरकुटे, गौरव ठोंबरे हे सर्च ऑपरेशन मध्ये राबवित आहेत.
काही नागरिकांना ही व्यक्ती नदीमध्ये नसल्याची शंका असल्याने पिंजर पो.स्टे. ठाणेदार नंदकीशोर नागलकर साहेबांनी आसरामाता मंदीरावर लावले असलेले सीसीटीव्ही कॅमेरे यातील फुटेज पाहले आणी त्यामध्ये ही व्यक्ती नदीमध्ये बुडत असतांना दीसली आणी खात्री झाली असल्याने आता त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन चालु केले असल्याची माहिती पथक, प्रमुख दिपक सदाफळे यांनी दीली आहे.
अधिक वाचा : बाळापूर येथील मन नदीत आत्महत्या केलेल्या अनोळख इसमाचा रेल्वे तिकीटवरून लावला बाळापूर पोलिसांनी शोध
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola