तेल्हारा (प्रतिनिधी) : सकल मराठा फाऊंडेशन तेल्हारा तालुका व ओझोन मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आज सेठ बंन्सीधर विद्यालय तेल्हारा येथे भव्य रोग निदान शिबीर संपन्न झाले.
सकल मराठा फाऊंडेशन तेल्हारा तालुका व ओझोन मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक सेठ बंन्सीधर विद्यालय तेल्हारा येथे निशुल्क भव्य रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ओझोन हॉस्पिटलचे चेअरमन डॉ.विनित हिंगणकर से.ब.विद्यालयाचे सचिव गोपाल मल्ल कोषाध्यक्ष विठ्ठलराव खारोडे डॉ.ज्ञानेश्वर तराळे डॉ.विक्रम जोशी डॉ.अमोल धोरण डॉ.अचीन मुरारका डॉ.प्रीती काळने डॉ.आशिष गिर्हे डॉ.शिरीष आंबेकर डॉ.पराग डोईफोडे डॉ.तिवारी डॉ.देशमुख डॉ.मोनिका तराळे उपस्थित होते. या शिबिरासाठी रुग्णांना निशुल्क तपासणी करून मोफत औषधीची व्यवस्था करण्यात आली होती शिबिरामध्ये ११२८ रुग्णांनी नोंदणी केली होती. यावेळी डॉ.हिंगणकर व गोपाल मल्ल यांनी आपले विचार सर्वांनसमोर मांडले या शिबिराच्या कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता राजकुमार शेंडे अनंत सोनमाळे अनुप पाटील मार्के विठ्ठल वाघोडे विवेक खारोडे अजय पा.गावंडे श्रीकांत पाथ्रीकर ऍड.संदीप देशमुख दीपक मार्के अनिकेत बकाल धनंजय खारोडे आशिष देशमुख धीरज बकाल उध्दव पाथ्रीकर गजानन गायकवाड दिलीप पिवाल सचिन थाटे सुमित गंभीरे सचिन तायडे रवी राऊत दीपक पुंडकर रोशन अहेरकर आशिष पारस्कर दत्ता चिकटे राम कडू बजरंग कोठे गणेश कडू अनंता दही डॉ.अनुप चौधरी डॉ.अनिल मल्ल मंगेश कोकाटे सचिन कडू केशवराव मार्के रवी ताथोड बंटी राऊत शिवा फोकमारे विठ्ठल ताथोड रवी रोडे नाना पाटील नागेश मेहरे वैशाली वानखडे कोमल वाकोडे वैभव मनदसे तुकाराम अकतकर अर्चना बारस्कर सचिन मिश्रा इत्यादी सह सकल मराठा फाऊंडेशन तेल्हारा व ओझोन हॉस्पिटल अकोल्याचे सर्व कर्मचारी व समस्त मित्रपरिवार तेल्हारा उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक खारोडे प्रास्ताविक अनुप मार्के तर आभार प्रदर्शन अजय पा.गावंडे यांनी केले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola