तेल्हारा (प्रतिनिधी ) : मी राज्यभर फिरते मात्र अशी समर्पित तरुणाई प्रथमच बघितली,लोकजागर मंचाने महिलांना आर्थिक स्वयंपूर्ण करण्यासाठी खरोखर कृतिशील पाऊल उचलले आहे ,या मंचात महिलांचे भविष्य सुरक्षित असल्याचा विश्वास क्रांतिकारी आंदोलक तृप्ती देसाई यांनी येथे व्यक्त केला.
जागतिक महिला दिनाच्या निमित्याने येथील भागवत मंगल कार्यालय लॉन्सवर लोकजागर मंचाच्या महिला सन्मान मेळाव्यात तृप्ती देसाई बोलत होत्या.अनिल भय्या गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याला उद्योजिका नम्रता शहा,ऍड.सुधाकर खुमकर,पुरुषोत्तम आवारे,गजानन बोरोकार,श्रीकांत पागृत,अनंत सपकाळ,गोपाल जळमकार, संदीप गावंडे,सूरज शेंडोकार,राजेश काटे आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकजागर महिला गृह उद्योगाच्या लोगोचे तृप्ती देसाई यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.लोगजागर तर्फे सुरू करण्यात आलेल्या गुळपट्टी उद्यगाचेही यावेळी उदघाटन करण्यात आले.आगामी काळात या भागातील किमान एक हजार महिला दर महिन्याला 15 ते 20 हजार रुपये गृह उद्योगातून कमावतील असा आमचा प्रयत्न असून येत्या दोन महिन्यात या भागात सीएनजी गॅस,लोक डेअरी हे आणखी दोन प्रकल्प सुरू होत आहेत,या माध्यमातून 200 तरुणांना प्रत्यक्ष आणि 300 तरुणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार असून अंदाजे पाच हजार शेतकरी कुटुंबाना त्याचा हातभार लागणार आहे अशी माहिती संस्थापक अनिल गावंडे यांनी दिली.महिलांना कामगार नव्हे तर कारखानदार करण्याचे आमचे स्वप्न असून त्या दिशेने आमचा प्रवास असल्याचे ते म्हणाले.
ऍड.सुधाकर खुमकर यांनी प्रास्तविक करून गेल्या दीड वर्षात झालेला लोकजागर आपल्या ओजस्वी वाणीतून उभा केला.यावेळी अकोट तेल्हारा तालुक्यातील 13 कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये हिवरखेड येथील विमालबाई निंबोकार,नलिनीताई लहाने,नलिनीताई इंगळे,लीलाताई रंदे, कोकिळताई बकाल,सावरा येथील उर्मिलाताई उणारे,रंभापुर येथील संगीताताई चौखंडे,मंचनपूर येथील रामताई चौधरी,अकोट येथील कल्यानीताई जाधव,ज्योतिताई वानखडे,निलीमाताई घोटकर,ममताताई गावंडे या महिलांचा समावेश होता. सौंदळा येथील शिव महिला मंडळाच्या महिला दर दशमीला ग्राम सफाई करतात,या सर्व महिलांचा या समारंभात सन्मान करण्यात आला.उद्योजिका नम्रता शहा यांनी उद्योजकीय मानसिकता घडवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करून मार्केटिंगच्या टिप्स दिल्या.या मेळाव्याला दोन हजारावर महिला उपस्थित होत्या.सोहळ्याचे सूत्र संचालन पुरुषोत्तम आवारे यांनी तर आभार प्रदर्शन गजानन बोरोकार यांनी केले.
याच कार्यक्रमात लोकजागर महिला आघाडीच्या अकोट तालुकाध्यक्षपदी भावनाताई गावंडे यांची तर अकोट शहाराध्यक्षपदी सौ.वैशालिताई बिबेकर यांची नियुक्ती करण्यात आली. महिला सन्मान मेळाव्यासाठी हजारो महिलांनी गर्दी केल्याने गर्दीचा हा उच्चांकी आकडा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय आहे.
अधिक वाचा : लोकजागर मंचची तेल्हारा शहर कार्यकारिणी जाहीर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola