तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा येथील संभाजी चौक येथे झालेल्या हत्याकांड प्रकरणाच चित्र तेल्हारा पोलिसांचा तपास बघता चोवीस तासात स्पष्ट होण्याचे संकेत आहेत.
तेल्हारा येथील संभाजी चौक येथील रहिवासी रमेश हागे ५० यांची त्याच्या घरासमोरील झोपडीत हत्या झाल्याची बाब काल सकाळी उघडकीस आली होती.त्यामुळे शहरात एकच खळबळ माजली होती.सदर घटना पोलिसांना माहिती पडताच तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास देवरे हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल होऊन तपास चक्रे फिरवली.त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सोनवणे,एल सी बी प्रमुख कैलास नागरे,यांच्या सह श्वान पथक,ठसे तज्ञ यांनी घटनास्थळी दाखल होऊन कसून तपास केला.तसेच याप्रकरणी शहरात सुद्धा चौकशी करून योग्य तो तपास करण्यात येत आहे.यावेळी घटनास्थळा वरून आपत्तीजनक वस्तू जप्त केल्या असून सर्व नातेवाईक यांची कसून चौकशी सुरू असून पोलिसांचा तपास बघता येत्या 24 तासात आरोपींची नावे उघड होऊन आरोपींना अटक करण्यात येनार असल्याची शक्यता आहे.या हत्याकांडात कोण आरोपी आहे हे सद्या अनुरुत्तीत आहे.
अधिक वाचा : तेल्हारा ब्रेकिंग- ५० वर्षीय इसमाची हत्या करून प्रेत घरासमोर आणून टाकले !
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola