तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा येथील ५० वर्षीय येथील इसमाला जाळून त्याची हत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली यामुळे तेल्हारा तालुक्यात एकच खडबड उडालि आहे.
प्राप्त माहितीनुसार तेल्हारा शहरातील ५० वर्षीय रमेश ओंकार हागे रा संभाजी चौक हे काल मजुरी करिता बाहेर शेतामध्ये गेले होते मात्र काल रात्री पर्यन्त ते घरी आले नसल्याने घरच्यांनी शोध घेतल्याचे बोलले जात आहे रमेश हागे यांच्याकडे दोन एकर शेती असून ते शेती करून उदरनिर्वाह करतात.आज सकाळी पहाटेच्या दरम्यान मृतकाच्या घराजवळ मृतक रमेश हागे यांचा मृतदेह जळलेला तसेच रक्ताच्या थारोड्यात आढळला त्यामुळे एकच खळबळ उडाली होती घटनेची माहिती शहरात पसरताच बघ्याची एकच गर्दी जमली आहे.घटनास्थळी तेल्हारा पोलिसांनी प्रथमदर्शनी पाहणी केली असून यावेळी मृतकाच्या जवळ एक चिट्ठी मिळाली असून त्यामध्ये आत्महत्या करीत आहो असे म्हटले आहे.मात्र घटनास्थळी जळलेला मृतदेह मात्र सापडलेली चिट्ठी थोडीही जळलेली नसल्याने पोलीस यावेळी अवाक झाले होते.जर आत्महत्या केली आहे तर मृतदेह जळलेला रक्तात माखलेला कसा घटनास्थळी दुसरी कुठलीही वस्तू न जळालिली त्यामुळे हत्याच असल्याचे प्रथम कयास लावण्यात आला आहे.श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.नेमके कोणत्या कारणांनी हत्या केली याचा तपास तेल्हारा पोलीस करणार आहेत.रमेश हागे यांच्या पश्चत पत्नी ,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.