अकोला(प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे अमरावती येथील शिवाजी महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी आले असता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तावडे यांना ‘आर्थिक स्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना इच्छा असुनही उच्च शिक्षण घेता येत नाही,सरकार त्यांना मोफत उच्च शिक्षणासाठीची सोय उपलब्ध करुन देईल काय?’हा प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांला ‘तुला झेपत नसेल तर, शिकु नको.
नोकरी कर’,असे उद्दटपणे उत्तर देऊन त्यांचे चित्रीकरण करणाऱ्या युवराज दाभाडे या विद्यार्थ्याला अटक करण्याचे आदेश तावडे यांनी देऊन पोलीसांनी तात्काळ त्याला डांबुन ठेवल्या या घटनेचा आज सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्हा महानगर च्या वतीने टावर चौक येथे शिक्षणमंत्री विनोद तावडेचा जाहीर निषेध करुन मुख्यमंत्र्यांनी तावडेंचा राजीनामा हा त्वरीत घ्यावा अन्यथा सम्यक विद्यार्थी आंदोलन पुढील काळात आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला.या निदर्शनात सम्यकचे महाराष्ट्र राज्य सचिव हितेश जामनिक, अमरावती विभागीय अध्यक्ष नितेश किर्तक,जिल्हाध्यक्ष अमोल सिरसाट,कोषाध्यक्ष योगेश किर्तक,महानगर अध्यक्ष आकाश गवई, महासचिव पवन गवई, अमरदीप वानखडे, मिलिंद वानखडे, प्रकाश प्रधान, डाॅ.खंडारे, शुक्लोधन डोंगरे, दिलीप शिरसाट, अक्षय गोपणारायन, सुरज जामनिक, अक्षय डोंगरे, निखिल तायडे यांसह सम्यक विद्यार्थी आंदोलन चे अनेक विद्यार्थी पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा : जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची जनजागृती
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola