महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा मोठा स्टार नाही. त्यामुळे ठाकरे चित्रपट प्रदर्शित होत असताना अन्य सिनेनिर्मात्यांना त्या दिवशी आपला चित्रपट प्रदर्शित करावासा वाटणार नाही, असे विधान अभिनेता आमिर खानने केले आहे. शुक्रवारी मुंबईत लठ्ठपणा शल्यचिकित्सक डॉ.संजय बोरुडे यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन आणि अभिनेता आमिर खान यांच्या हस्ते अनावरण करण्यात करण्यात आले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी आमिर खानला ठाकरे चित्रपटासंदर्भात प्रश्न विचारला.
यावर आमिर म्हणाला, महाराष्ट्रात बाळासाहेबांपेक्षा कोणीही मोठा स्टार नाही. ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित होताना कोणत्याही सिनेनिर्मात्याला त्यावेळी आपला चित्रपट प्रदर्शित करावासा वाटणार नाही. प्रत्येक निर्मात्याला चांगल्या दिवशी आपला चित्रपट प्रदर्शित व्हावा असे वाटते. पण ज्यावेळी मोठा चित्रपट येणार असतो तो चित्रपट आणि आपला चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होऊ नये असेही त्याला वाटत असते. बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील मोठे स्टार होते आणि बाळासाहेबांवरील चित्रपट महाराष्ट्रात प्रत्येकालाच पहावासा वाटेल. त्यामुळे त्या दिवशी कोणताही निर्माता आपला चित्रपट प्रदर्शित करु इच्छिणार नाही, असे आमिरने स्पष्ट केले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरे यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली होती. ‘ठाकरे चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे, या तारखेला अन्य कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही’, अशा आशयाची पोस्ट त्यांनी टाकली होती. तर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना बाळा लोकरे यांनी ‘२५ जानेवारीला अन्य चित्रपट प्रदर्शित झाल्यास शिवसेना स्टाइलने उत्तर देऊ’, असे सांगितले होते. संजय राऊत यांनी यावर स्पष्टीकरण दिले होते. ही पक्षाची भूमिका नसल्याचे त्यांनी सांगितले होते.
अधिक वाचा : बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola