पातूर (सुनिल गाडगे): पुरातन वस्तूंचा संग्रह जतन सह आत्मसात करणे काळाची गरज! आजच्या गतिमान विज्ञानाच्या युगात मानवी जीवनात झपाट्याने बदल होत आहेत. पुर्वी मानवाला आपली उपजीविका भागविण्यासाठी दमछाक होत होती, परंतु त्या काळात अनेक प्राचीन काळापासून चालत आलेल्या कला जोपासत मानवाच्या दैनिक जीवनात झपाट्याने आज सर्वच क्षेत्रात बदल होत असताना आता सर्व सोई उपलब्ध आहेत,तर प्राचीन वस्तू आज खर्या अर्थाने कालबाह्य होत चालल्या आहेत. आजच्या धावपळीच्या जीवनात तरुणांनी त्यांचे जतन करणे काळाची गरज आहे. असे आवाहन ठाणेदार हरिश गवळी यांनी केले ते पातूर शहरातील पुरातन वस्तूंचा छंद जोपासणारे संजय गाडगे यांनी कालबाह्य दुर्मिळ वस्तूंचा संग्रहालयात भेट दिली त्या प्रसंगी बोलत होते, येथील संजय गाडगे यांनी पुरातन कालबाह्य वातीचे स्टो, घरगुती इळे, कंदील, दूरध्वनी टेलिफोन , इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू , रेडिओ, टेलिव्हिजन, धातू पासुन बनलेल्या वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे, लाकडी खेळणी, आदी कालबाह्य पुरातन वस्तू संग्रहालय उभारले आहे.
या संग्रहालयात पातुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हरीश गवळी यांनी परिवारासह भेट देऊन कालबाह्य होत चालल्या प्राचीन वस्तू संग्रहालय हे भविष्यात एक भावी पिढी साठी मैलाचा दगड ठरेल असा विश्वास व्यक्त करुन संजय गाडगे यांची प्रशंसा केली, व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले दरम्यान आजच्या धावपळीच्या जीवनात तरुणांनी बदलत्या काळात प्राचीन काळापासून चालत आलेल्या कला,व कालबाह्य होत चालल्या प्राचीन वस्तू संग्रहालयात जोपासली जाते तर हे जतन करून भावी पिढी साठी एक दिश्या दर्शक ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला व पातुर शहरांमध्ये स्थायिक व फिरते वस्तू संग्रहालय करण्याचा मानस संजय गाडगे यांनी बोलून दाखविले तसेच नागरिकांनी त्यांच्याकडे काही प्राचीन व दुर्मिळ वस्तू असल्यास संजय गाडगे यांच्याशी संपर्क साधावा संपर्क नं. 9823535656