वाशिम (सुनिल गाडगे): प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर पोलीस कवायत मैदान वाशिम येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन पिंजर महाराष्ट्र जिवरक्षक दिपक सदाफळे यांना निमंत्रण पत्रिका देऊन निवासी उप-जिल्हाधिकारी मा.शैलेशजी हींगे सर यांनी सत्कार करुन आम्ही करीत असलेल्या महाराष्ट्रभरातील उत्कृष्ट आपत्ती व्यवस्थापना बद्दल कौतुकाची थाप देऊन पुढील वाटचालीसाठी भर भरुन शुभेच्छा दिल्या.
यासह आपत्कालीन सेवेत रस्ते अपघात सेवेत मदतीसाठी तत्पर असणारे मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन महाराष्ट्र द्वारा संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक, पिंजर जिल्हा अकोला शाखा मंगरूळपीर येथील स्वयंसेवकांचा सन्मान पत्र देऊन शितल बंडगर मॅडम तहसीलदार मंगरूळपीर यांनी आयोजन केले होते.तसेच पोलीस स्टेशन मंगरूळपीर आणी पोलीस स्टेशन आसेगाव यांनी सुद्धा सत्काराचे आयोजन केले होते. पहीला सन्मान सखारामजी मुळे सर उपविभागीय अधिकारी,मंगरूळपीर मा.शितल बंडगर मॅडम तहसीलदार मंगरूळपीर,यांच्या हस्ते तसेच राजेश बोंडे साहेब नायब तहसीलदार निवडणुक,गजानन जवादे साहेब नायब तहसीलदार महसूल यांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ आणी सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले.
तसेच दुसरा सन्मान मंगरूळपीर पो.स्टे.येथे ठाणेदार हुड सर आणी पोलीस कर्मचारी यांच्या वतीने सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले. तिसरा सन्मान नगरपरिषद मंगरूळपीर येथे नगरपरिषद प्रशासक तथा उ.वि.अ.मं.मा. सखारामजी मुळे सर मुख्यधिकारी मा.सतीश शेवदा सर यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले.
चौथा सत्कार आसेगाव पो. स्टे. येथे ठाणेदार सागर दंदे सर आणी पोलीस कर्मचारी यांच्या वतीने सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले. यामध्ये स्वयंसेवक अतुल उमाळे गा. बा. आ. शोध. व. ब. पथक, पिंजर शाखा मंगरूळपीर प्रमुख, आणी स्वयंसेवक योगेश पाटील कावरे, गोपाल गीरे,अपूर्व चेके, गोपाल जयस्वाल, अजय डाके, लखन खोडे,सुमित मुंढरे,सुमित सुडके,संजय गाढवे, शुभम भोपळे, संतोष मांडवगडे, गोपाल राऊत, शुभम सातरोटे,यांना गौरवण्यात आले.या बद्दल मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे जिवरक्षक यांनी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय तथा तहसील मंगरूळपीर कार्यालय,व पोस्ट.स्टे मंगरूळपीर, नगरपरिषद मंगरूळपीर आणी पोलीस स्टेशन आसेगावसह वाशिम जिल्ह्यातील प्रशासनाचे आभार व्यक्त केले. अशी माहिती वाशिम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधीकारी शाहु भगत साहेब यांनी दिली आहे.