अकोला दि. 4 :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात आयोजित कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे व तहसिलदार शिल्पा बोबडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.