अकोला, दि.11 :- अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग उमेदवारांकरिता आयोजित पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यास उत्तम प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात भरती प्रक्रियेसाठी 92 उमेदवारांनी सहभाग नोंदविला तर निवडप्रक्रियेनंतर 24 जणांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे,अशी माहिती जिल्हा रोजगार स्वयंरोजगार व कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी दिली.
जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि अकोला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्यावतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात 34 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात प्रमुख सहा आस्थापनांनी सहभाग घेतला. भरती प्रक्रियेसाठी 92 दिव्यांग उमेदवारांनी आपला सहभाग नोंदविला. त्यात निवडप्रक्रियेनंतर 24 जणांची प्राथमिक निवड झाली.
६ आस्थापनांनी केली २४ उमेदवरांची प्राथमिक निवड
आजच्या मेळाव्यात 1) गर्द्रे ऑटोकॉन प्रा.लि. अकोला, 2) सांगलीवाला कलेक्शन, अकोला, 3) में अनिता मोटर्स, अकोला, 4)सार्थक इंडिया एज्यूकेशन स्ट्रस्ट,अकोला, 5) ट्रेड कार्ट डिजीटल प्रा.लि.(ग्राम ॲप), अकोला, 6) नमस्ते वेंचर प्रा.लि. या खाजगी आस्थापनांच्यावतीने एकूण 34 पदांच्या भरतीचे नियोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात जिल्ह्यातील 92 दिव्यांग उमेदवारांनी सहभाग नोंदविला. यापैकी 24 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनातर्फे दर महिन्यात रोजगारमेळाव्याचे आयोजन केले जाते.
उमेदवारांकरीता रोजगार मेळाव्याच्या ठिकाणीच नोंदणीकरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा समन्वय शैक्षणिक गुणवत्ता कक्षाचे गजानन महल्लेयांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच जिल्हा रोजगार स्वयंरोजगारव कौशल्य विकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.