• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पक्षी सप्ताहानिमित्तः विशेष लेख: अकोल्याचे पक्षी वैभव

Our Media by Our Media
November 11, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
83 0
0
Bird
12
SHARES
596
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोल्याचे पक्षी वैभव

अकोला जिल्ह्याचा बहुतांश भूभाग जैवविविधतेने संपन्न आहे. ट्रॉपीकल ड्राय झोन, सातपुड्याच्या पर्वतरांगा, गवताळ माळरान, शुष्क पानगळीची वने, अभयारण्य या हिरवाईमुळे. तसेच नदी, धरणे ,तलाव व जलाशय आदी पाणथळीच्या ठिकाणांमुळे जिल्ह्यात मोठया प्रमाणात पक्षी आकृष्ट होवून त्यांचा अधिवास वाढला आहे, परिणामी जिल्हाला पक्षी वैभव लाभले आहे.

अकोला जिल्हाचा ट्रॉपीकल ड्राय झोनमधे समावेश आहे. उत्तरेकडे सातपुड्याच्या गाविलगड पर्वतरांगांमधे नरनाळा, पुर्वेकडे गवताळ माळरान, दक्षिणेकडे शुष्क पानगळीची वने तर पश्चिमेकडे गवताळ माळराने व खुरट्या वनस्पतीं आहे. अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा अभयारण्य तसेच मेळघाटच्या काही भागाशिवाय काटेपूर्णा व मोर्णा नदीसह पोपटखेड, महान, दगडपारवा, मोर्णा धरणा शिवाय बोरगाव मंजू, कापशी , कुंभारी, विझोरा, अखतवाडा शिवाय लहान लहान तलाव व जलाशय असून पाणथळी चे ठिकाण, गवतळ व खुले रानमाळा, शेतजमीन सोबतच कृषी विद्यापीठ चे वनक्षेत्र लाभले असल्या कारणाने इथे पक्ष्यांची पण विविधता दिसून येते.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

पक्ष्यांना योग्य अधिवास व पोषक वातावरण मिळत असल्याने भरपूर प्रमाणात पक्ष्यांमध्ये वैविध्यता पहायला मिळते. स्थानिक पक्षी राघू, मैना, हळद्या, दयाळ, सुभग, खबुतर, खाटीक, चंडोल, सुतार, हुदहुद, पोपट, घुबड, चिरक, वटवट्या, तितर, घर, गरुड, बदक, करकोचे इतर प्रजातीच्या पक्षी जिल्ह्यात येतात. तसेच, देशाच्या विविध राज्यांतून स्थलांतर करणाऱ्या वारकरी, हळदी कुंकू, कमळ पक्षी, जांभळी पाणकोंबडी, राखी बगळा, जांभळा बगळा, शराटी, पाणकावळे, दर्दीमुख, चक्रवाक या पाणपक्ष्यांसह गडवाल, थापट्या, दलदली ससाणा, साधा करकोचा आदी पक्षांचाही जिल्ह्यात वावर आढळतो. विदेशातून जसे की युरोप, रशिया, मंगोलिया, सायबेरिया कडून विदेशी लांब पल्याचे पक्षी मालगुजा godvit, तुतारी Stint, ससाणा falcon, कलहंस grayleg Goose, पट्टकदम Bar-headed goose, कौंच cranes, युरेशियन नीलपंख European Roller सारख्या प्रजाती पक्षीही जिल्ह्या आढळतात.

जिल्ह्यातील विविध भागांत पक्षांच्या आवडत्या अदीवासात झाडी, माळरानात पाणवठ्यांवर काही काळ थांबून ते परत जातात. या स्थलांतरकाळात पक्ष्यांचे कमी-अधिक प्रमाणात दर्शन घडत असते कधीतरी नशिबाने एखाद्या दूर्मीळ पक्षी पण दर्शन देवून जातात. आतापर्यंत अकोला जिल्हाचे पक्षीनिरीक्षण करताना जिल्ह्यात एकूण ३४६ पक्ष्यांची नोंद झाली असून त्यांची वर्गवारी ७० प्रजाती कुटुंबात करण्यात येते. यातील जवळपास १८८ प्रजाती निवासी पक्षी आहेत तर १५८ प्रजाती स्थलांतरित पक्षी आहेत. यातील बरेच पक्षी हे हिवाळ्यात स्थलांतर करणारे आहेत तर पावसाळ्याच्या सुरवातीला व पावसाळ्यात पण हे पक्षी स्थलांतर करुन येतात. काही पक्षी निवासी स्थलांतरन करणारे, प्रजनन स्थलांतरित करणारे आणि काही न थांबता निघून जाणारे तर काही भटक्या प्रजाती (कधीतरी दिसणारे) दूर्मीळ पक्षांच्या प्रजातींची नोंद घेतल्या गेली आहे.अकोला जिल्ह्यातील पक्ष्यांच्या नोंदी करताना शहरातील इतर पक्षीप्रेमी मित्रांचे सहकार्य लाभत आहे. पक्षांची जैवविविधता हा निसर्गातील महत्त्वाचा घटक असून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी त्यांचे संवर्धन करण्यात सहकार्य करावे.

देवेंद्र तेलकर

लेखक, वन्यजीव अभ्यासक आहेत .

Previous Post

‘चला जाणू या नदीला’ संवाद यात्रेतून घडणार जनजागृती ; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

Next Post

मेटा, ट्विटर, मायक्रोसॉफ्ट नंतर आता Amazon ने ३,७०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ? जाणून घ्या, कर्मचारी कपाती मागचं कारण

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
Amazon

मेटा, ट्विटर, मायक्रोसॉफ्ट नंतर आता Amazon ने ३,७०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ? जाणून घ्या, कर्मचारी कपाती मागचं कारण

nima arora

खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.