अकोट (प्रतिनिधी)- प्रगती पॅनलच्या वतीने शनिवारी (ता.१८) अकोट येथील झुनझुनवाला अतिथीगृह येथे स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमामध्ये अकोला जिल्यातील शिक्षक मतदारांनी प्रगती पॅनलच्या २१ ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार केला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उर्दू शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष हमीद शारीक तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्रगती पॅनलचे मुख्य निमंत्रक गोकुलदास राऊत, प्रकाश राऊत, पतसंस्थेचे माजी अध्यक्ष विजय टोहरे समन्वयक सुरेंद्र मेटे, स्वाभिमानी मित्रपरिवार अध्यक्ष तथा उमेदवार रामदास कडू, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती अकोला जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष रा.का. वानखडे, उर्दू शिक्षक संघटना अकोला चे जिलाध्यक्ष मो. अझरोद्दीन अ.भा. आदिवासी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ग.ल. पवार, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मंगेश दसोडे, महाराष्ट्र स्वाभिमान शिक्षक संघ अकोलाचे राजेंद्र ताडे, विजयकुमार पाटकर, अकोला शिक्षक पतसंस्थेचे संचालक संजय इंगळे, मारोती वरोकार, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष तथा संचालक निलेश काळे, प्रहार शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष अमर भागवत, सेवानिवृत्त शिक्षक मनोहरपंत कुळकर्णी, रमेश शेंडे, कास्ट्राईब शिक्षक संघटना अमरावती जिल्हाध्यक्ष तथा उमेदवार श्री राजेश गाडे, शिक्षक समितीचे अकोला जिल्हा सरचिटणीस प्रशांत अकोत, शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्धीप्रमुख तथा उमेदवार श्री राजेश सावरकर, समिती महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अमरावती तथा उमेदवार सरिता ताई काठोडे, प्रगति पॅनलचे प्रफुल्ल शेंडे, अजयानंद पवार, राजेंद्र गावंडे, मोहम्मद शोएब अंजूम अहममद, मोहम्मद नाझिम अब्दुल गफार, कैलास कडू, छगन चौधरी, उमेश उर्फ उत्तम चुनकीकर, योगीराज मोहोड, नितीन अविनाशे, तुळशीदास धांडे, विजय उर्फ गिरीश कोठाळे, सुनील बोकाडे, संगीता तडस व प्रगती पॅनलचे संपूर्ण पदाधिकारी उपस्थित होते. दि.अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रगती पॅनलकडून अमरावती विभागात जोरदार प्रचाराचा झंझावात सुरू आहे. शिक्षक कर्मचारी सभासद मतदार बंधू भगिनींची पहिली पसंत प्रगती पॅनलला मिळत आहे. अकोट येथे झालेल्या सभेत शिक्षक बँकेच्या सर्व सभासदांनी प्रगती पॅनलच्या २१ ही उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचा एकमुखी संकल्प केला आहे.
प्रगती पॅनल सत्तेत आल्यास अकोट येथे शाखा उभारणार- श्री गोकुलदास राउत
गोकुळदास राऊत म्हणाले की, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यातील सभासदांची विरोधक दिशाभूल करून वाटेल तसे आश्वासने देत आहे. एकेकाळी अमरावती सोडून इतर जिल्ह्यातील शिक्षकांना बँकेचे सभासदत्व देऊ नये असा हट्ट करणारे, बँकेला विभागीय केल्याने टीका करणारे आज अकोला, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यातील सभासदांना वेगवेगळी आश्वासने देत आहेत. त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मनोगतातून विरोधकांना चांगलेच फटकारले.
राऊत यांनी अकोला जिल्ह्यातील सर्व सभासदांना आश्वासन दिले की, अकोल्यातील सभासदांच्या सोयीसाठी तसेच या जिल्ह्यात अकोट मध्ये जास्त सभासद आल्यामुळे प्रगती पॅनल सत्तेत येताच लवकरात लवकर आकोट येथे नवीन शाखेचा प्रस्ताव धामणगाव, वाशिम शाखेच्या प्रस्तावा सोबत पाठविला जाईल. पॅनल नी शिक्षकांसाठी झटणाऱ्या मेहनती, सर्व संमायोजक, लोकांना संधी दिल्याने, जवळपास २५ शिक्षक संघटनांच्या पाठींबा आणि सत्तेत असताना बँकेचे भांडवल १७२ कोटी वरून ४०० कोटी पर्यंत वाढविले, व्याजदर २% कमी केले, जवळपास सर्वच तालुक्यात बँकेच्या स्वमालकीच्या इमारती बांधल्या, कर्ज मर्यादा वाढविल्या इत्यादी मुळे प्रगती पॅनल पुन्हा सत्तेत येईल असे राउत यांनी भाषणात सांगितले. पुढे राऊत म्हणाले की निवडणूक आली म्हणून तोंडात येईल तसे आश्वासन देणे निरर्थक आहेत. ज्या गोष्टी रिझर्व्ह बँकेच्या नियमात राहून शक्य आहेत आणि सभासदांच्या हिताच्या आहेत त्याना प्रगती पॅनल सत्तेत आल्यास प्राधान्य देईल. लवकरच डिव्हीडन्ट वाटप, गृहकर्ज पुर्णवत चालू केल्या जाईल असे आश्वासन त्यांनी दिलें.
प्रगती पॅनलच्या पुर्ण २१ उमेदवारांना विजयी करण्याचा अकोला जिल्हा शिक्षक समिती आणि सर्व सहभागी संघटनाचा निर्धार- विजय टोहारे
अकोला शिक्षक समितीचे विद्यमान शिक्षक पतसंस्थेचे संचालक तसेच माजी अध्यक्ष श्री विजय टोहर यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक सादर करताना सर्व उपस्थित शिक्षकांना आव्हान केले की प्रगती पॅनलच्या 21 सही उमेदवारांना नाव न पाहता प्रगती पॅनल ला मिळालेल्या शिक्क्यावर मतदान करावे.
सर्वच उर्दू शिक्षक संघटना एकजुटीने प्रगति पॅनल सोबत: हमीद शारीक, मो. अजरुद्दोन
अकोला जिल्हा सोबतच ईतर जिल्यातील तीनही उर्दू शिक्षक संघटना प्रगति पॅनल सोबत असल्याचे उर्दू शिक्षक संघटनेचे राज्याधक्ष हमीद शरिक आणि उर्दू शिक्षक संघटनेचे अकोला अध्यक्ष मो. अजरुद्दिन यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
बँकेच्या विकासासाठी फक्त प्रगती पॅनल सक्षम- रा. का. वानखडे
आपल्या प्रशासकीय अनुभवातून शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष रा.का. वानखडे म्हणाले कि निवडणुकीत उतरलेल्या सर्व पॅनल पैकी फक्त प्रगती पॅनलच बँकेच्या विकासासाठी सर्व समायोजक आणि सक्षम असे पॅनल आहे. प्रगती पॅनलच्या नेतृत्वावर त्यांचा पुर्ण विश्वास आहे. त्यांची जन्मभूमी अकोला असल्यामुळे त्यांनी आवर्जून अकोल्यातील सभासदांना प्रगती पॅनलच्या 21 उमेदवारांना विजयी करण्याचे आव्हान केले.
प्रगती पॅनल ला अकोल्यातील शिक्षक संघटनांचा जाहीर पाठिंबा
यावेळी अकोल्यातील बहुसंख्य शिक्षक संघटनांनी प्रगती पॅनलला पाठिंबा दिलेला आहे त्यामध्ये उर्दू शिक्षक संघटना जिल्हा अकोला अखिल भारतीय आदिवासी शिक्षक परिषद शिक्षक आघाडी ( प्राथ) तसेच महाराष्ट्र स्वाभिमान शिक्षक संघ यांनी कार्यक्रमामध्ये पाठिंबा जाहीर केला. पाठिंब्याचे पत्र निमंत्रक श्री. गोकुलदास राऊत यांच्याकडे सुपूर्द केले. या स्नेहमिलन सोहळ्याचे संचालन श्री. अमोल आगे तसेच आभार प्रदर्शन श्री. शिवशंकर खंडेराय केले.