मुंबई- २०१९ मध्ये एका अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमीष दाखवून वारंवार बलात्कार (POCSO act) करणाऱ्या आरोपीचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेला आहे. सुनावणी करीत असताना न्यायाधिशांनी म्हटलं आहे की, “ज्या पीडितेवर बलात्कार झाला तेव्हा पीडितेचे वय १६ वर्षे होते, त्यामुळे दोघांच्यात होणाऱ्या लैंगिक संबंधांच्या परिणामांची जाणीव पीडितेला होती. तसेच आरोपीने लैंगिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर केलेला होता.”
९ सप्टेंबर २०१९ साली घडलेल्या बलात्काराच्या प्रकरणात कोल्हापूर पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केलेली होती. तेव्हापासून आरोपी कोठडीतच आहे. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग आरोपीचा जामीन मंजूर केला.