• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, May 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची कामगिरी; कोविडबाधीत ७० रुग्णांना १०० हून अधिक डायलिसीस सेवा

Our Media by Our Media
March 3, 2022
in Featured, अकोला, आरोग्य, कोविड १९
Reading Time: 1 min read
87 1
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची कामगिरी; कोविडबाधीत ७० रुग्णांना १०० हून अधिक डायलिसीस सेवा
14
SHARES
631
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.३– कोविड संसर्गानंतर गुंतागुंत होऊन रुग्णाच्या शरिरात अंतर्गत अवयव कार्यप्रणालीत अडथळे निर्माण होतात. काहीवेळा मुत्रपिंडाने (किडनी) काम करणे बंद केल्यास, रुग्णांना कोविड उपचारासोबत डायलिसीस करणे आवश्यक असते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डायलिसीस युनिटने या काळात मोलाची कामगिरी बजावत ७० हून अधिक रुग्णांना १०६ डायलिसीस सेवा दिली व त्यांना जीवनदान दिले.

कोविडची दोन वर्षे ही साऱ्यांचीच परीक्षा पाहणारी होती. जागतिक महामारी असलेल्या या आपत्तीने प्रशासन ते सामान्य नागरिक साऱ्यांचीच कसोटी घेतली. वैद्यकीय तज्ज्ञांचे तर ज्ञान,कसब, संयम सारेच पणाला लागले. कोविड उपचारादरम्यान येणारी सर्वात कठीण स्थिती म्हणजे संसर्ग आटोक्याबाहेर गेल्यावर अंतर्गत अवयवांचे एक एक करुन निकामी होत जाणे. अशा वेळी बाह्य उपचारांवर शरिरातील या निकामी झालेल्या अवयवांचे काम पूर्ववत करणे हे डॉक्टरांपुढे एक जिकरीचे काम होऊन बसते. उदा. श्वसन संस्था निकामी होऊ लागल्यावर व्हेंटिलेटरचा वापर करणे इ.  मुत्रपिंड निकामी होणे; ही एक अशीच वैद्यकीय समस्या उपचारांदरम्यान सोसावी लागली.  काही रुग्णांची मुत्रपिंडे उपचारादरम्यान निकामी होत. असे जवळपास ७० रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या लाटेत आढळून आले.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

अशा रुग्णांना डायलिसीस उपचार द्यावे लागतात. यासंदर्भात अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांनी माहिती दिली की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे  डायलिसीसची पाच संयंत्रे आहेत. त्यातील चार ही विधानसभा सदस्य आ.रणधीर सावरकर यांच्या आमदार निधीतून मिळालेली असून एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आहे. कोविड रुग्णांवरील उपचारासाठी त्यातील दोन संयंत्रे वापरण्यात आली.  कोविड आयसीयु मध्ये ही यंत्रे स्थापित करुन अंतर्गत अवयव निकामी होण्याची समस्या भेडसावणाऱ्या रुग्णांसाठी ही वापरण्यात आली. ७० रुग्णांना मुत्रपिंड निकामी होण्याची समस्या निर्माण झाली. अशा रुग्णांना मग डायलिसीस देण्यास ही संयंत्रे कामी आली. त्यातील जवळपास सर्वच रुग्णांना त्याचा लाभ होऊन त्यांना जीवनदान मिळाले. काही रुग्णांना मात्र अधिक गुंतागुंत निर्माण होऊन म्युकरमायकोसिस वगैरे सारख्या अतिजटील समस्यांमुळे मृत्यू आला. त्याचे प्रमाण अत्यल्प आहे,असेही डॉ. गजभिये यांनी सांगितले.

याशिवाय ज्या रुग्णांना नियमित डायलिसीसची आवश्यकता असते,अशा रुग्णांना सेवा देणेही सुरुच होते. हे काम अन्य दोन संयंत्रांवर सुरु असते. तेथे आतापर्यंत १५० हून अधिक डायलिसीस झाले आहेत. हे कामही अव्याहतपणे सुरु असते. त्यासाठी डायलिसीस तंत्रज्ञ व अन्य वैद्यकीय पथक अहोरात्र परिश्रम घेत असते. हे काम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली  डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, डॉ. प्रशांत मालविया, डॉ. रितू मोटवानी,  तंत्रज्ञ रितू देशमुख, साजिद शेख, नंदकिशोर बाजड, अधिपरिचारिका  जयश्री बढे, रुपाली पिंजरकर यांचे पथक कार्यरत असते.

कोविडचा सामना करतांना डॉक्टर्सना अक्षरशः योद्ध्यांप्रमाणे अहोरात्र झुंजावे लागले. रुग्णांचे मुत्रपिंड निकामी झाल्याने करावा लागणारा हा एक अनोखा समर प्रसंग असतो, त्यासाठी डायलिसीस युनिटने मोलाची कामगिरी बजावली आणि अनेकांना अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.

कोविड संसर्गानंतर गुंतागुंत होऊन रुग्णाच्या शरिरात अंतर्गत अवयव कार्यप्रणालीत अडथळे निर्माण होतात. काहीवेळा मुत्रपिंडाने (किडनी) काम करणे बंद केल्यास; रुग्णांना कोविड उपचारासोबत डायलिसीस करणे आवश्यक असते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डायलिसीस युनिटने या काळात मोलाची कामगिरी बजावत ७० हून अधिक रुग्णांना १०६ डायलिसीस सेवा दिली व त्यांना जीवनदान दिले.
कोविडची दोन वर्षे ही साऱ्यांचीच परीक्षा पाहणारी होती. जागतिक महामारी असलेल्या या आपत्तीने प्रशासन ते सामान्य नागरिक साऱ्यांचीच कसोटी घेतली. वैद्यकीय तज्ज्ञांचे तर ज्ञान,कसब, संयम सारेच पणाला लागले. कोविड उपचारादरम्यान येणारी सर्वात कठीण स्थिती म्हणजे संसर्ग आटोक्याबाहेर गेल्यावर अंतर्गत अवयवांचे एक एक करुन निकामी होत जाणे. अशा वेळी बाह्य उपचारांवर शरिरातील या निकामी झालेल्या अवयवांचे काम पूर्ववत करणे हे डॉक्टरांपुढे एक जिकरीचे काम होऊन बसते. उदा. श्वसन संस्था निकामी होऊ लागल्यावर व्हेंटिलेटरचा वापर करणे इ. मुत्रपिंड निकामी होणे; ही एक अशीच वैद्यकीय समस्या उपचारांदरम्यान सोसावी लागली. काही रुग्णांची मुत्रपिंडे उपचारादरम्यान निकामी होत. असे जवळपास ७० रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या लाटेत आढळून आले.

अशा रुग्णांना डायलिसीस उपचार द्यावे लागतात. यासंदर्भात अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांनी माहिती दिली की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे डायलिसीसची पाच संयंत्रे आहेत. त्यातील चार ही विधानसभा सदस्य आ.रणधीर सावरकर यांच्या आमदार निधीतून मिळालेली असून एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आहे. कोविड रुग्णांवरील उपचारासाठी त्यातील दोन संयंत्रे वापरण्यात आली. कोविड आयसीयु मध्ये ही यंत्रे स्थापित करुन अंतर्गत अवयव निकामी होण्याची समस्या भेडसावणाऱ्या रुग्णांसाठी ही वापरण्यात आली. ७० रुग्णांना मुत्रपिंड निकामी होण्याची समस्या निर्माण झाली. अशा रुग्णांना मग डायलिसीस देण्यास ही संयंत्रे कामी आली. त्यातील जवळपास सर्वच रुग्णांना त्याचा लाभ होऊन त्यांना जीवनदान मिळाले. काही रुग्णांना मात्र अधिक गुंतागुंत निर्माण होऊन म्युकरमायकोसिस वगैरे सारख्या अतिजटील समस्यांमुळे मृत्यू आला. त्याचे प्रमाण अत्यल्प आहे,असेही डॉ. गजभिये यांनी सांगितले.

याशिवाय ज्या रुग्णांना नियमित डायलिसीसची आवश्यकता असते,अशा रुग्णांना सेवा देणेही सुरुच होते. हे काम अन्य दोन संयंत्रांवर सुरु असते. तेथे आतापर्यंत १५० हून अधिक डायलिसीस झाले आहेत. हे कामही अव्याहतपणे सुरु असते. त्यासाठी डायलिसीस तंत्रज्ञ व अन्य वैद्यकीय पथक अहोरात्र परिश्रम घेत असते. हे काम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, डॉ. प्रशांत मालविया, डॉ. रितू मोटवानी, तंत्रज्ञ रितू देशमुख, साजिद शेख, नंदकिशोर बाजड, अधिपरिचारिका जयश्री बढे, रुपाली पिंजरकर यांचे पथक कार्यरत असते.

कोविडचा सामना करतांना डॉक्टर्सना अक्षरशः योद्ध्यांप्रमाणे अहोरात्र झुंजावे लागले. रुग्णांचे मुत्रपिंड निकामी झाल्याने करावा लागणारा हा एक अनोखा समर प्रसंग असतो, त्यासाठी डायलिसीस युनिटने मोलाची कामगिरी बजावली आणि अनेकांना अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.

Tags: AkolaCoviddialysisDr. GajbhiyeMedical CollegePatients
Previous Post

Obc Reservation : राज्‍य मागसवर्ग आयोगाचा अहवाल सर्वोच्‍च न्‍यायालयाने नाकारला

Next Post

‘विकेल ते पिकेल’: १६५ एकरावर बहरले औषधी गुणधर्माचे ‘जवस’

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
‘विकेल ते पिकेल’: १६५ एकरावर बहरले औषधी गुणधर्माचे ‘जवस’

‘विकेल ते पिकेल’: १६५ एकरावर बहरले औषधी गुणधर्माचे ‘जवस’

crime murder

यवतमाळ हादरले! दगडाने ठेचून प्रेयसीचा खून, प्रियकराने ब्लेडने स्वत:चाही गळा चिरला

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker