• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, May 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

‘विकेल ते पिकेल’: १६५ एकरावर बहरले औषधी गुणधर्माचे ‘जवस’

Our Media by Our Media
March 3, 2022
in अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, शेती
Reading Time: 1 min read
108 1
0
‘विकेल ते पिकेल’: १६५ एकरावर बहरले औषधी गुणधर्माचे ‘जवस’
17
SHARES
778
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.३:  शेतकऱ्यांचा आर्थिक उत्कर्ष व्हावा यासाठी ‘विकेल ते पिकेल’, ही संकल्पना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी विभागाला दिली. त्यावर अंमलबजावणी करीत अकोला येथील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’ अंतर्गत रब्बी हंगामात प्रायोगिक तत्त्वावर ‘जवस’ पिकाची लागवड करण्यात आली. या प्रयोगाला शेतकऱ्यांनीही उत्तम प्रतिसाद देत जिल्ह्यात १६५ एकर क्षेत्रावर जवस पीक बहरले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी दिली आहे.

जवस हे औषधी गुणधर्म असलेले व खनिज;जीवनसत्वेयुक्त तेलबिया पीक. जवसाचे तेल काढता येते. उच्च रक्तदाब, संधीवात, वयोमानानुसार येणारी गुडघेदुखी इ. आजारांवर उपयुक्त आहे. जवसाचा आहारात समावेश असला की, पचन शक्तीत सुधारणा होते. हिवाळ्यात शरिरात उष्णता टिकवून ठेवण्याचे काम करते. असे हे जवस पीक उत्तम आर्थिक मोबदला देणारे आहे.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

जवस पीक रब्बी हंगामातील पीक असून पूर्णतः कोरडवाहू आहे. सरे पाडून पेरणी यंत्राने पेरणी केल्यास जमिनीतील वाफशावर हे पीक येते. पारंपारिक पद्धतीत बियाणे फोकून (फेकून) पेरणी करण्यात येते, मात्र कृषी विभागाने पेरणी यंत्राने पेरणी करण्याची शिफारस केली आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात बार्शी टाकळी, तेल्हारा, अकोट, पातूर, बाळापूर या पाच तालुक्यात १६५ एकर क्षेत्रावर जवस लागवड करण्यात आली आहे. प्रत्येक शेतकऱ्याची एक एकर जमिन या प्रमाणे १६५ शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे. एकरी ४ ते ५ क्विंटल पर्यंत पिकाचे उत्पन्न अपेक्षित आहे. यंदा लागवड केलेल्या हंगामात या पिकावर कोणतेही किड वा रोग असल्याचे निरीक्षणात आढळून आले नाही, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

नोव्हेंबरच्या शेवटच्या व डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लागवड केलेल्या या पिकाची जिल्ह्यात वाढ जोमदार आहे. सध्या पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. ११० दिवसांनंतर पीक परिपक्व होऊन जवसाचे दाणे आकारात येतात. दाण्यांचा गुच्छ असतो. पीक कापणीच्या वेळी हा गुच्छ किंवा तुरा कापून मळणी यंत्रात मळणी करुन जवसाचे उत्पादन घेता येते. जवसावरील कवच काढून आतील बी सदृष्य दाणा हे जवस म्हणून प्रत्यक्ष वापरता येते. त्यापासून तेल काढता येते किंवा पूरक अन्न म्हणूनही ते वापरतात. जवस घालून अनेक पदार्थ, चटण्या आदी करुन त्याचे सेवन करता येते. सध्या बाजारात औषधी गुणधर्म असलेल्या या पिकास सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव आहे.

यंदा हे जवसाचे अकोला जिल्ह्यातील प्रात्यक्षीकाचे वर्ष आहे, ह्या नाविन्यपूर्ण पिकाच्या लागवडीला ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे, आणि इथल्या जमिनीनेही ह्या पिकाची जोमदार वाढ दिली आहे, ते पाहता भविष्यात जवसाच्या लागवडीचे क्षेत्र वाढून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाची हमी मिळण्याची खात्री निर्माण झाली आहे.

Tags: AkolaJawas experimentalmedicinal
Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची कामगिरी; कोविडबाधीत ७० रुग्णांना १०० हून अधिक डायलिसीस सेवा

Next Post

यवतमाळ हादरले! दगडाने ठेचून प्रेयसीचा खून, प्रियकराने ब्लेडने स्वत:चाही गळा चिरला

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
crime murder

यवतमाळ हादरले! दगडाने ठेचून प्रेयसीचा खून, प्रियकराने ब्लेडने स्वत:चाही गळा चिरला

Nagpur

रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील न्युक्लियर पावर प्लांटला आग, रेडिएशन लीक होण्याची भिती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.