• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, May 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Russia Ukraine war : पाकिस्तान, तुर्कीने घेतला भारतीय तिरंग्याचा आधार

Our Media by Our Media
March 3, 2022
in Featured, आंतराष्ट्रीय
Reading Time: 1 min read
143 5
0
pakistan
22
SHARES
1.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

कीव्ह :  युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धाला आता सात दिवस उलटले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना तिथून सुखरूप परत आणण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन गंगा’ सुरू केले आहे. (Russia Ukraine war)

मोदी सरकारने युक्रेनमधील भारतीयांना बंकर किंवा हॉस्टेलमधून बाहेर पडताना त्यांच्या बसवर तिरंगा ध्वज लावण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून रशियन फौजा त्यांना दुखापत करणार नाहीत.

तिरंग्याच्या याच ताकदीचा वापर आता युक्रेनमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी आणि तुर्कीच्या विद्यार्थ्यांनीही करायला सुरुवात केली आहे.

पाकिस्तान तसेच तुर्कीच्या विद्यार्थ्यांनीही रशियन हल्ल्यांपासून बचावासाठी घरांच्या पडद्यांना तिरंगा ध्वजाप्रमाणे रंगवून गाड्यांवर लावले आहेत. युक्रेनमधून सुखरूप बाहेर पडण्यासाठी ही युक्ती पाकिस्तानी आणि तुर्की विद्यार्थ्यांनी केली आहे. पण यातून एकप्रकारे भारताच्या परराष्ट्र संबंधांची बळकटीच दिसून येत आहे.

भारतीय दूतावासाने दिशानिर्देश जारी करताना युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घराबाहेर पडताना गाड्यांवर तिरंगा ध्वज लावण्यास सांगितले होते.

दरम्यान, युक्रेनमधून भारतात परतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनीही तिरंग्यामुळेच जीव वाचल्याचे म्हटले आहे. तसेच इतर देशाचे नागरिक आणि विद्यार्थीही तिरंगा ध्वजाचेच ‘कवच’ करून सुरक्षितपणे बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

भारतात परतलेल्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, युक्रेनमधील सैन्यासोबत बोललो तेव्हा त्यांनी सांगितले की, तुम्ही भारतीय असाल तर अजिबात घाबरू नका. कारण भारत आणि रशियाचे संबंध चांगेल आहेत. त्यामुळे कुणालाही काहीही नुकसान पोहोचणार नाही.

Russia Ukraine war : पाक, तुर्कीचे विद्यार्थी म्हणाले, प्लॅन यशस्वी झाला

रोमानियाची राजधानी बुखारेस्टहून परतलेल्या तुर्की आणि पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांनीही याची कबुली दिली. भारतीय तिरंगा ध्वजाच्या कवचामुळेच युक्रेनबाहेर सुखरूप पडू शकतो, याची जाणीव झाली.

त्यानंतर पडद्यांवर स्प्रेच्या सहाय्याने तिरंगा ध्वज साकारला. भारताचे राष्ट्रगीतही गायले आणि दोन्ही बससमोर दोन तिरंगा ध्वज लावले. हा प्लॅन यशस्वी झाला. रशियन सैन्याला वाटले की आम्ही सर्व भारतीय विद्यार्थी आहोत, त्यामुळे आम्हाला जाऊ दिले.

Tags: PakistanRussia UkraineRussia Ukraine war
Previous Post

मिशन वात्सल्य योजनेची अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी निमा अरोरा

Next Post

महाडिबिटी प्रणालीवर ऑनलाईन शिष्यवृती अर्ज करण्यास मुदतवाढ

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
महाडिबिटी प्रणालीवर ऑनलाईन शिष्यवृती अर्ज करण्याचे आवाहन

महाडिबिटी प्रणालीवर ऑनलाईन शिष्यवृती अर्ज करण्यास मुदतवाढ

सुप्रिम

Obc Reservation : राज्‍य मागसवर्ग आयोगाचा अहवाल सर्वोच्‍च न्‍यायालयाने नाकारला

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.