अकोला : आज गणेशोत्सव संबंधी शांतता समितीची सभा सुरू असतांना शासनाने अगोदर जारी केलेल्या कोरोना नियमावलीच्या व्यतिरिक्त आज दि.8 सप्टेंबर 2021 च्या शुद्धीपत्रकानुसार, गणेशमूर्तींचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात येत असून दर्शन केवळ ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे उपलब्ध करुन देण्यात यावे.
सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शासनाने जारी केल्याचे सभेत सांगण्यात आले.
त्याच सभेत मंडळाचे पदाधिकार्यानी शासनाचे कोविड संबंधी आम्ही सर्व निर्बंध पाळण्यास तैयार आहोतच पण गणपतिचे प्रत्यक्ष दर्शनावर पाबंदी व फक्त आॅनलाईन दर्शन शासनाचे हे फर्मान गणेशभक्तांची भावना दुखावणारा निर्णय आहे. हा हिंदु धर्माला आहत करणारा निर्णय अम्हाला मान्य नाही,असे ठणकाउन सांगीतले व त्या सभेनंतर सर्व गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांनी कलेक्टर आफीसच्या बाहेर शासनाच्या या फर्मान चे जोरदार निर्दशने करुन निषेध नोंदवला .










