तेल्हारा(प्रतिनिधी)- तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम रायखेड येथे आज सकाळी तुटलेल्या विद्युत तारांना स्पर्श होऊन शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार ग्राम रायखेड येथील सीमा गजानन वानखडे वय ४५ वर्ष ही महिला सकाळी ६ वाजताच्या दरम्याम इंधन आणण्याकरिता घराजवळील परिसरात गेल्या असता सदर ठिकाणी विद्युत तारा तुटलेल्या अवस्थेत होत्या त्यावेळी विद्युत तारांना हाताचा स्पर्श होऊन मृतक सीमा वानखडे यांना जबर शॉक लागला यावेळी गावकऱ्यांनी धाव घेऊन मृतक महिलेला ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन जात असताना वाटेतच सदर महिलेचा मृत्यू झाल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले.हिवरखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे शवविच्छेदन करून ग्राम रायखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मृतक सीमा वानखेडे यांच्या पश्चत दोन मुले पती असा परिवार आप्त परिवार आहे.पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत.
सदर या प्रकरणात मृतक महिलेच्या नातेवाईकांनी असा आरोप केला आहे की तुटलेल्या तारांबाबत संबंधित अधिकारी कर्मचारी यांना तोंडी माहिती दिली होती मात्र त्यांनी ही बाब गंभीरतेने घेतली नाही.असा आरोप केला आहे.
शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी
मृतक महिला सीमा वानखडे यांच्या घरची परिस्थिती अत्यन्त हलाखीची असून मोलमजुरी करून आपल्या संसाराचा गाढा चालवीत होती.अशात सदर महिलेचा मृत्यू झाल्याने शासनाने त्वरित मदत द्यावी अशी मागणी जिह्वा परिषद सदस्य संजय अढाव यांनी केली आहे.










