• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, May 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home फिचर्ड

सत्ता डोक्यात गेलेल्या राजकीय कार्यकर्त्यांकडून पत्रकारास दमदाटी, गुन्हे दाखल करा अन्यथा राज्यभर आंदोलन -एस.एम. देशमुख

Our Media by Our Media
September 9, 2021
in फिचर्ड, राजकारण, राज्य
Reading Time: 1 min read
109 1
0
s m deshmukh president marathi patrakar parishad
51
SHARES
783
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : अधिकाऱ्यांच्या विरोधात बातमी असूनही आपल्या आमदार साहेबांच्या विरोधी बातमी आहे असे समजून चाकुर जि. लातुर येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘देशोन्नती’ कार्यालयासमोर धुडगुस घालीत ‘देशोन्नती’चे प्रतिनिधी विकास स्वामी यांना दमदाटी करून अर्वाच्च शिवीगाळ केली. चाकुरच्या पत्रकारांनी चार-पाच दिवसांपूर्वीच केलेल्या तक्रारीची दखल न घेता दबावामुळे अर्जच दडवून ठेवला. लातुरच्या जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणी गंभीरपणे लक्ष द्यावे व संबंधितांवर गुन्हे दाखल करून दादागिरी थांबवावी अन्यथा पत्रकारांना राज्यभर आंदोलन करावे लागेल, असा इशारा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे मुख्य निमंत्रक एस.एम. देशमुख यांनी एका पत्रकान्वये दिला आहे.

एस.एम. देशमुख यांनी आपल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, सत्ता डोक्यात गेली की, माणूस बेभान होतो. लातुर जिल्ह्यातील चाकूर येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे कृतीतून दाखवून दिलं. बातमी अधिकारांच्या विरोधात होती, ती आपल्या साहेबांच्या म्हणजे आमदारांच्या विरोधात आहे असे समजून राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते उठले आणि ‘देशोन्नती’चे पत्रकार विकास स्वामी यांच्या कार्यालयासमोर गेले.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

तेथे त्यांनी धुडगूस घालत ‘देशोन्नती’ च्या अंकाची होळी केली. कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी स्वामी यांच्याशी हुज्जत घातली आणि त्यांना अर्वाच्च शिविगाळ ही केली. विषय इथंच संपत नाही. स्वामी आणि चाकूरच्या चार पाच पत्रकारांनी पोलिसात तक्रार दिली. मात्र पाच दिवस झाले अजून गुन्हा दाखल झालेला नाही. तक्रार अर्ज पोलिसांनी दडवून ठेवलाय. स्पष्ट दिसतंय की, पोलिसांवर कोणाचा तरी दबाव आहे म्हणून पोलीस गुन्हा दाखल करायला टाळाटाळ करीत आहेत. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या दादागिरीचा आणि पोलिसांच्या निष्क्रीयतेचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई निषेध करीत आहे..

राज्यातील पत्रकारांवर पुन्हा हल्ले वाढले आहेत. याचं कारण पत्रकारांच्या तक्रारी पोलीस दाखल करून घेत नाहीत आणि घेतल्या तरी पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करीत नाहीत. पोलीस दबावाखाली काम करताहेत हे चाकूरच्या घटनेनं पुन्हा दाखवून दिलं आहे. लातूरच्या जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणात लक्ष घालून पत्रकारांच्या विरोधात सुरू असलेली दादागिरी थांबवावी अन्यथा राज्यभर आंदोलन करावे लागेल. असा इशारा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे मुख्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी दिला आहे..

Previous Post

कोल्हापूर : प्रेम प्रकरणातून युवकाचा खून, गावातील मुलीवरील प्रेम जीवावर बेतले

Next Post

घोडेगाव तंटामुक्ती अध्यक्ष्यपदी मोईन खान यांची विजयाची हॅट्रिक

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
moin khan

घोडेगाव तंटामुक्ती अध्यक्ष्यपदी मोईन खान यांची विजयाची हॅट्रिक

driving license

वाहन चालविण्याच्या पक्क्या अनुज्ञप्ती चाचणीसाठी आरटीओ कार्यालय शनिवार, रविवारीही सुरु राहणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.