• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, May 18, 2022
36 °c
Akola
36 ° Sat
36 ° Sun
36 ° Mon
35 ° Tue
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home कोविड १९

चीनमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचा फैलाव प्रचंड वेगाने

Our Media by Our Media
August 12, 2021
in कोविड १९, Corona Featured
Reading Time: 1 min read
0
चीनमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचा फैलाव प्रचंड वेगाने
32
SHARES
1.5k
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

बालगृहातील 61 बालकांचे कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण

लसीकरणासाठी सक्ती नको; निर्बंध मागे घ्यावेत, सुप्रीम कोर्टाचे निर्देश

 डेल्टा प्लस व्हेरियंटचा फैलाव प्रचंड वेगाने :

अवघ्या जगाच्या मागे कोरोनाचा भस्मासुर सोडून नामानिराळा राहिलेल्या चीनमध्येच आता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.

चीनच्या पाच प्रांतांत कोरोनाच्या या प्रकाराचा वेगाने फैलाव सुरू असून, राजधानी बीजिंगसह चीनमधील अनेक महत्त्वाच्या शहरांत कडक लॉकडाऊन लागू केला आहे.

‘कोरोनाचा भस्मासुर’ :

डिसेंबर 2019 मध्ये चीनच्या हुवेई प्रांतातील वुहान शहरातील प्रयोगशाळेतून सर्वप्रथम कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. मागील दोन वर्षांत कोरोनाने अवघ्या जगाला कवेत घेतले.

कोरोना जगभर थैमान घालत असताना चीनमध्ये मात्र सगळे आबादीआबाद होते. त्यामुळे कोरोना हे चीनचेच षड्यंत्र असल्याचा संशय जगभरातील देशांना आजही आहे.

मात्र, चीनने नेहमीच या आरोपांचा इन्कार केला होता, तरीदेखील अनेक देशांनी चीनला यासाठी जबाबदार धरून वेगवेगळ्या माध्यमातून बहिष्कृत करायला सुरुवात केली आहे.

डिसेंबर 2019 मध्ये चीनमधील कोरोनाग्रस्तांची संख्या 94 हजारांवर पोहोचली, त्यामध्ये त्यानंतर वाढ झाली नसल्याचा चीनचा दावा आहे.

पुढे वाचा:

COVID-19 vaccine : देशात मॉर्डना लसीला आपत्कालीन वापरास मंजुरी

डेल्टा प्लस व्हेरियंटचा फैलाव

मात्र, गेल्या आठवड्यापासून चीनमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचा फैलाव प्रचंड वेगाने होत असल्याचे स्थानिक सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. चीनच्या जियांगत्सू प्रांतातील गांजिंग विमानतळावरून कोरोनाच्या या विषाणूने चीनमध्ये प्रवेश केल्याचे मानले जात आहे.

अल्पावधीतच या विषाणूने चीनच्या जियांगत्सू, हूनान, यांगत्सू आणि हुवेई प्रांतात मोठ्या प्रमाणात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. या भागात डेल्टा प्लसचे हजारो नवीन रुग्ण आढळून येत आहेत.

खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या आठवड्यापासून राजधानी बीजिंगसह देशातील प्रमुख बारा शहरांत आणि अन्य काही प्रांतामध्ये नव्याने लॉकडाऊन लागू केले आहे.

दररोज लाखो लोकांची चाचणी केली जात आहे. चीनच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या अनेक प्रमुख शहरांमध्ये सध्या लॉकडाऊनमुळे शुकशुकाट आहे.

हा लॉकडाऊन किती काळ चालेल, हे निश्चित नाही. त्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला जबर दणका बसण्याची शक्यता आहे.

चीनची कोरोना प्रतिबंधक लस नव्या डेल्टा प्लस व्हेरियंटपुढे निष्प्रभ ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्याचप्रमाणे कोरोनाच्या या नव्या प्रकारावर लस शोधण्यात चीनला अजून किती वेळ लागेल ते सांगता येत नाही.

एकूणच जगाला आपल्या विस्तारवादी सापळ्यात अडकविण्यासाठी चीनने लावलेल्या कोरोनाच्या सापळ्यात चीन आता स्वत:च अडकू लागला आहे.

चीनमधील कम्युनिस्ट राजवटीला धोका

डेल्टा व्हेरियंटमुळे पाच प्रांतांमध्ये लॉकडाऊनची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात चीनच्या कम्युनिस्ट राजवटीविरुद्ध असंतोष निर्माण होऊ लागला आहे.

Tags: Corona delta plus varient
Previous Post

अवैध धंदे बंद तर हे काय?अवैध धंदेवाले पोलिसांना जुमानत नाहीत का!

Next Post

महाराष्ट्राचा एकही नेता पंतप्रधान का नाही? गडकरींनी दिलं उत्तर

RelatedPosts

बालगृहातील 61 बालकांचे कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण
Featured

बालगृहातील 61 बालकांचे कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण

May 9, 2022
Supreme-Court
Featured

लसीकरणासाठी सक्ती नको; निर्बंध मागे घ्यावेत, सुप्रीम कोर्टाचे निर्देश

May 2, 2022
vacination
Featured

DGCI : ६ ते १२ वयोगटातील बालकांच्या लसीकरणाला मंजुरी

April 26, 2022
राजेश टोपेचं
Featured

कोरोनावर आरोग्यमंत्री राजेश टोपेचं मोठं विधान, म्हणाले.

April 20, 2022
महिला व बालविकास विभागाचा उपक्रम; बालगृहातील 61 बालकांचे लसीकरण
Featured

महिला व बालविकास विभागाचा उपक्रम; बालगृहातील 61 बालकांचे लसीकरण

April 6, 2022
nima arora collector jilhadhikari akola
Featured

१२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आरोग्य व शालेय शिक्षण विभागाने संयुक्त नियोजन करावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

March 22, 2022
Next Post
महाराष्ट्राचा एकही नेता पंतप्रधान का नाही?;

महाराष्ट्राचा एकही नेता पंतप्रधान का नाही? गडकरींनी दिलं उत्तर

मुख्यमंत्री

शाळा बंदच राहणार; ठाकरे सरकारकडून शालेय विभागाचा निर्णय रद्द

Stay Connected

  • 319 Followers
  • 284 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

रामकृष्णजी आढे

अकोला जिल्ह्यातील ग्राम केळीवेळीचे आदर्श व्यक्तिमत्व रामकृष्णजी आढे,वाचा सविस्तर

May 17, 2022
murder crime

धुळे : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने डोक्‍यात लोखंडी पावडी टाकून केली बापाची हत्या

May 12, 2022
MahaDBT-Scholarship

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती प्रलंबीत अर्ज महाविद्यालयांनी निकाली काढावेत

May 16, 2022
Child_Marriage

अकोला बाल संरक्षण कक्षाने रोखले चार बालविवाह

May 11, 2022
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks