अकोला– आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 142 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 141 अहवाल निगेटीव्ह तर एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.1) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57767(43182+14408+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर एक + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह एक.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 305363 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 301814 फेरतपासणीचे 397 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3152 नमुने होते. आजपर्यंत एकूण 305333 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 262151 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
एक पॉझिटिव्ह
आज दिवसभरात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एका पुरुषांचा समावेश असून ते अकोला मनपा क्षेत्रातील आहे. दरम्यान काल (दि.1) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, त्याची नोंद एकूण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे, याची नोंद घ्यावी.
तीन डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
45 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57767(43182+14408+177) आहे. त्यात 1134 मृत झाले आहेत. तर 56588 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 45 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.