अकोला – जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना घरकुल नुकसान भरपाईचे चार हजार कुटूंबाना सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले असून उर्वरित नुकसानग्रस्त कुटूंबांना उद्या (दि.3) रोजी धनादेशाव्दारे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात येणार आहे. नुकसानग्रस्त भागातील कुटूंबांना तातडीने सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी दिले.
जिल्ह्यात सानुग्रह अनुदान वाटपासाठी 10 हजार 286 घरकुलांच्या नुकसानभरपाई पोटी 5 कोटी 14 लक्ष 30 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देय आहे. त्यापैकी कोषागारात 6513 घरकुलांच्या नुकसानभरपाई साठी 3 कोटी 25 लक्ष 65 हजार रुपयांचे देयक कोषागारात सादर करण्यात आले होते. त्यापैकी 4022 घरकुलांना तीन कोटी 25 लक्ष 65 हजार रुपये सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले असून उर्वरित घरकुलांना तातडीने वाटप करण्यात येणार असल्याचे माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.