गरसोळी(प्रतिनिधी)- पातोंडा गरसोळी गट ग्राम पंचायत असुन पाणी पुरवठा विभागाच्या गलथाल कारभाराला नागरिक हैराण झाले आहेत. या कोरोणाच्या माहामारित दुशित पाणी पुरवठा कुटासा ते हिंगणी हे मुख्य लाईन असुन पुर्वी याच लाईन वर गरसोळी व पातोंडा हे गाव होते तेव्हा सुरळीत व मुबलक पाणी पुरवठा होत असे पण आता मात्र वेळोवेळी लाईन बदलन्यात येते जिथे नाही तिथे वाल बसवण्यात येतात पाणी पुरवठा विभागाच्या मनमानी कारभाराचा नाहक त्रास पातोंडा गरसोळी ला होत आहे विचारणा केल्यास उलट सुलट उत्तरे मिळतात लिकिज आहे पाईप उखळतात वाॅल चे जास्त थ्रेट खोलता येत नाही आतापर्यंत असा त्रास दोन्ही गावाला झाला नाही पाणी वेळेवर येत नाही पाणी पुरवठा विभागाच्या लाईन मध्ये जागो जागी लिकिज आहेत पिण्याच्या पाण्याची दुर्गंधी येते, जनावरे सुध्दा पाणी पित नाही याचा जबर फटका दोन्ही गावाला बसत आहे. ऐवढ त्रास सहन करुनही सुरळित पाणी मिळत नाही अस मत नागरिक नोंदवत असल्याने नागरिकांच रोष पहायला मिळत आहे.
अश्या गडुळ पाण्याने नागरिकांच आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचा-यांना वारंवार सुचना देऊन सुद्धा पंधरा पंधरा दिवस पाणीच सोडण्या येत नाही पाणी सोडले कि, संपूर्ण पाणी गढुळ उन्हाळ्या तरी पाणी पुरवठा सुरळीत होत होता ऐन पावसाळ्याच्या दिवसात दुशित पाण्याला समोरी जाण्याची वेळ पातोंडा गरसोळीच्या नागरिकांवर आली आहे नेमक पिण्यासाठी पाणी आणावतरी कुठुन असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे पातोंडा गरसोळी गावाचा पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिका कडुन होत आहे .










