• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, May 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

दुकाने आस्थापना सकाळी सात ते दुपारी चार पर्यंत सुरु राहणार; जिल्हाधिकारी पापळकर यांचे आदेश

City Reporter by City Reporter
June 6, 2021
in Corona Featured, अकोला, कोविड १९
Reading Time: 3 mins read
90 1
0
papadkar
47
SHARES
651
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला अकोला जिल्ह्यात कोविड रुग्‍णांचा पॉझीटीव्‍हीटी रेट व ऑक्सिजन बेडची उपलब्‍धता तसेच दैनंदिन आढळणाऱ्या रुग्‍णांची परिस्थिती लक्षात घेता सुधारीत सूचना निर्गमित केल्या असुन Level Restrictions for Braking the Chain अंतर्गत अकोला जिल्ह्याकरिता   सोमवार दि. 7 जूनचे सकाळी सात वाजल्यापासून ते पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित  केले आहेत.

राज्‍यातील कोविड-19 च्‍या दुसऱ्या लाटेची स्थिती लक्षात घेता, राज्याचे मुख्य सचिव यांनी  सुधारीत सुचना निर्गमित आहेत. त्यानुसार अकोला जिल्हा श्रेणी तीन मध्ये समाविष्ट करण्यात आला असून  त्यानिर्देशानुसार  आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानुसार प्राप्त अधिकारानुसार आदेश निर्गमित करण्यात आले.

अ.क्र. बाब निश्चित करण्‍यात आलेली  वेळ
1 सर्व प्रकारची जिवनावश्यक व अत्यावश्यक सेवा,किराणा, व भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्य पेय विक्रेता यांची दुकाने, पिठाची गिरणी इ. व  सर्व प्रकाराची खाद्य पदार्थ विक्रीची दुकाने कोंबडी, मटन, पोल्ट्री मासे व अंडी यासह) दुग्ध विक्री केंद्रे, दुग्धालय, डेअरी, दुध संकलन केंद्र, दुध वितरण व्यवस्था, पाळीव प्राणी यांची खाद्यपदार्थ विक्री दुकाने कृषी सेवा केंद्रे, कृषी निवीष्ठांची दुकाने, कृषी प्रक्रिया उद्योगगृह शेती अवजारे आणी शेतातील उत्पादनांशी संबंधीत दुकाने, ‍ शीव भोजन केंद्र 50 टक्के आसन क्षमतेसह सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत

सोमवार ते रविवार

2 सर्व प्रकारची बिगर जिवनाश्यक सेवाअंतर्गत असलेली दुकाने व प्रतिष्ठाने     सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत

(सोमवार ते शुक्रवार सुरु शनिवार व रविवार पुर्णत: बंद)

3 हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत 50 टक्के आसन क्षमतेसह व त्यानंतर दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत व शनिवार रविवार पार्सल टेक अवे व घरपोच सेवा फक्त
4 सार्वनिक ठिकाणे, क्रिडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने बगीचे, मॉनिंग वॉक व सायकलींग दरारोज सकाळी पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत

 

5 सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापना व कार्यालये नियमितपणे सायंकाळी चार पर्यंत
6 कार्यालयीन उपस्थिती- शासकीय,निमशासकीय व खाजगी एकूण उपस्थीती 50 टक्के (अत्यावश्यक सेवा वगळून)
7 क्रिडा, खेळ सकाळी पाच ते दुपारी नऊ वाजेपर्यंत
8 सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमलने, मनोरंजनात्मक कार्यक्रम स्थानिक प्राधिकरण यांचे पुर्वपरवानगीने व 50 टक्के आसण क्षमतेसह
9 लग्न समारंभ (कॅटरींग, बँडपथक, वधू-वर पक्ष सह) 50 लोकांच्या उपस्थीतीत मंगल कार्यालये, सभागृह, विवाह स्थळी (कोरोनांच्यानियमांच्या पालनसह) पूर्व परवानगीसह (कोरोनांच्यानियमांच्या पालनासह) पूर्व परवानगीसह (शहराकरीता उपविभागीय अधीकारी, तालुका स्तरावरुन संबंधीत मुख्याधीकारी नगर परिषद, नगरपालीका तसेच ग्रामीण क्षेत्राकरीता तहसीलदार)
10 अत्यविधी 20 लोकांच्या उपस्थितीसह
11 सभा, बैठका, स्थानिक प्राधिकरण निवडणूक, सहकारी संस्था यांचे आमसभा आसन क्षमतेच्या 50 टक्के मर्यादेत
12 बांधकाम फक्त साईट व र असणारे प्रत्यक्ष मजुर अथवा बाहेरुन मजुर आणण्याच्या बाबतीत दुपारी चार वाजेपर्यंत
13 कृषी विषयक सेवा व कृषी सेवा केन्द्रे दुपारी चार वाजेपर्यंत
14 ई कॉमर्स वस्तु व सेवा नियमितपणे पूर्ण वेळ (कोविड नियमांचे पालन करुन)
15 जीम, व्यायामशाळा, सलुन, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर एकूण क्षमतेच्या 50 टक्के पूर्व नोंदणी (Appointment)  सह वातानुकुलीत सेवेस परवानगीद नाही (AC not allowed)
16 सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ण आसन क्षमतेसह वाहतूकीस परवानगी राहील तथापी प्रवासी यांना उभे राहून प्रवास करण्यास मनाई राहील.
17 मालवाहतूक जास्तीत जास्त तीन लोकांना परवानगी अनुज्ञेय (चालक, मदतनीस व इतर एक) नियमितपणे पूर्ण वेळ वाहतूक करता येईल (कोविड नियमांचे पालन करुन)
18 आंतर जिल्हा प्रवासी वाहतूक  (खाजगी, कार, टॅक्सी, बस, रेल्वे व्दारा) नियमितपणे पूर्ण वेळ परंतु लेव्हेल पाच मध्ये जिल्हयामधून जाणे येणे होत असल्यास ई-पास बंधनकारक
19 उत्पादन क्षेत्र, एमआयडीसी नियमितपणे पूर्ण वेळ ( कोविडनियमाचे पालन करुन)
20 उत्पादन क्षेत्र (अत्यावश्यक वस्तु व त्याकरीता लागणारे कच्चा माल उत्पादक व पॅकेजींग व संपूर्ण साखळीतील सेवा, निरंतर प्रक्रिया असलेले उद्योग, संरक्षण संबंधीत उद्योग डाटा सेंटर, क्लॉऊड सर्व्हीस प्रोव्हायडर, माहिती व तंत्रज्ञान सेवा संबंधी, गुंतागुतीचे पायाभूत सेवा व उद्योग) नियमितपणे पूर्ण वेळ

( कोविडनियमाचे पालन करुन)

21 उत्पादन क्षेत्र (अत्यावश्यक सेवा व निरंतर प्रक्रिया उद्योग, निर्यात प्रधान उद्योग वगळून इतर सर्व प्रकारचे उद्योग जे अत्यावश्यक सेवा अंतर्गत समाविष्ट नाही व निर्यात प्रधान नाहीत) 50 टक्के कर्मचारी व कामगार यांना हालचाल करण्याच्या परवानगीसह

 

संपूर्ण अकोला शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्‍ये सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी लागू राहील.  तसेच सायंकाळी पाच नंतर दुस-या दिवशी सकाळी पाच पर्यंत संचारबंदी लागू राहील.  या कालावधीमध्‍ये कोणत्‍याही व्‍यक्‍तीस मुक्‍त संचार करण्‍यास मनाई राहील.

Ø  अत्‍यावश्‍यक सेवेमध्‍ये खालील बाबींचा समोवेश असेल.

  1. सर्व प्रकारची हॉस्पीटल, उपचार केंद्रे, लसीकरण केंद्रे, रुग्णालये, क्लिनीक्स, वैद्यकीय विमा कार्यालये, औषधी दुकाने, औषधी निर्माती कंपन्या, वैकीय उत्पादनासंबंधित व  वितरणसंबंधीत विक्रेते यांची वाहतूक व त्या संबंधी असलेली पुरवठा साखळी, औषधालये, रुग्णालये, नर्सिंग होम व वैद्यकीय प्रयोगशाळा, रुग्णवाहिका तसेच इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा लसीकरण, सॅनीटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरणे व त्याबाबत कच्चा माल पुरविणारे उत्पादक
  2. सर्व प्रकारची पशुवैद्यकीय सेवा व प्राण्याची काळजी घेणारे निवारे तसेच पाळीव प्राणी यांची खाद्यपदार्थ विक्री दुकाने, वन विभागाने घोषीत केल्यानुसार वनीकरणासंबंधी सर्व कामे
  3. किराणा दुकाने, भाजीपाल्या विक्री केंद्रे, फळ विक्रेते, दुध विक्रेते, बेकरी,मिठाई तसेच सर्व प्रकारची खाद्यपदार्थ विक्री दुकाने
  4. सर्व प्रकारची शीतगृहे व वखार सेवा
  5. सर्व प्रकारची सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा उदा. सार्वजनिक बस सेवा, टॅक्सी, ऑटो
  6. स्थानिक प्रशासनव्दारा पावसाळयापूर्वी करावयाची सर्व प्रकारची कामे
  7. स्थानिक प्रशासनाव्दारा देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या सेवा
  8. रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत असणाऱ्या सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा
  9. दुरसंचार सेवा अंतर्गत असणाऱ्या सर्व प्रकारच्या दुरुस्ती व देखभाल सेवा
  10. सर्व प्रकारची मालवाहतूक, पाणी पुरवठा सेवा
  11. कृषी व त्या संबंधीत असणाऱ्या सर्व प्रकारच्या अखंडीत सेवा कृषी अवजारे, बि-बियाणे, खते व इतर आवश्यक उपकरणे यांची उपलब्धता,देखभाल व दुरुस्ती सेवा
  12. सर्व प्रकारच्या वस्तुंची आयात व निर्यात सेवा
  13. ई कॉमर्स सेवा(फक्त अत्यावश्यक उत्पादने व सेवा पुरविण्याकरीता)
  14. मान्यताप्राप्त असणाऱ्या सर्व माध्यमांची सेवा(Accredited Media)
  15. सर्व प्रकारची पेट्रोल व पेट्रोलीअम संबंधीत उत्पादने व सेवा, सर्व प्रकारची मालवाहतूक
  16. सर्व प्रकारच्या शासकीय व खाजगी सुरक्षा यंत्रणा
  17. माहिती व तंत्रज्ञान संबंधीत सर्व सेवा
  18. सर्व प्रकारची एटीएम केंद्रे
  19. सर्व प्रकारच्या पोस्ट व कुरअर सेवा
  20. अत्यावश्यक सेवा करीता सर्व प्रकारचा कच्चा माल उत्पादन करणारी केंद्रे व पॅकेजींग साहित्य निर्मिती केंद्रे
  21. स्थानिक प्रशासनाने निश्चीत केलेल्या कुठल्राही प्रकारच्या अत्यावश्यक सेवा

अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सुट

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

अ.   सर्व प्रकारची केंद्रीय व राज्य व स्थानिक शासकीय कार्यालये, सर्व प्रकारच्या वैधानिक प्राधिकरण व संस्थासह

आ. सहकारी संस्था, सार्वजनिक सेवा, शासकीय व खाजगी बँका

इ.     अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या सर्व प्रकारची खाजगी कंपनी यांची कार्यालये

ई.     विमा व वैद्यकीय सेवा कंपन्या

उ.     सर्व प्रकारच्या वैद्यकीय, औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची कार्यालये

ऊ.   सर्व प्रकारच्या नॉन बँकीग वित्तीय सेवा, सर्व प्रकारच्या सुक्ष्म वित्तीय सेवा

            आस्थापना, दुकाने, प्रतिष्ठाने ही चार वाजेपर्यंत सुरु राहतील. त्याठिकाणी  काम करणाऱ्या कर्मचारी यांनी सर्व आस्थापना, दुकाने प्रतिष्ठान ही दुपारी चार वाजता बंद झाल्यानंतर त्यांचे घरी पाच वाजेपर्यंत पोहचणे आवश्यक राहील. सायकाळी पाचनंतर अत्यावश्यक व वैद्यकीय कारणांशिवाय हालचाल करण्यास सक्त मनाई राहील.  कोरोनाविषाणूचा प्रादुभाव रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेतर्गंत स्वच्छता व सार्वजनिक शिस्तीचे पालन न करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कार्यवाही करण्याबाबतचे आदेश पारीत करण्यात आले आहे. त्यानुसार दंडात्मक कारवाही ही संबंधीत स्वराज्य संस्था यांनी करावी. या व्यतिरीक्त या कार्यालयाने कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध आकारवयाचे दंडाबाबतचे आदेश लागू राहतील, सर्व खाजगी व सार्वजनीक वैद्यकीय सेवा, पशुचिकीत्सा सेवा, त्यांचे नियमीत वेळेनुसार सुरु राहतील सर्व मेडीकल स्टोअर्स, औषधी दुकाने, औषधालये व दवाखाने तसेच ऑनलाईन औषध सेवा 24 तास या कालावधीत सुरु राहतील. या कार्यालयाने कोविडविषाणूचा प्रादुर्भाव व फैलाव होवू नये या करितानिर्गमित केलेल्या दंडाचे आदेश पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्यात येत आहेत.

            या सर्व निर्देशाचे काटेकारपणे अंमलबजावणी करण्‍याची जबाबदारी आयुक्त महानगरपालिका, जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला, महसूल विभाग तसेच  ग्रामीण भागात गट विकास अधिकारी तसेच नागरी भागात संबधित नगरपालीका/ नगर पंचायतीचे मुख्‍याधिकारी यांची राहील. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्‍याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी तथा INCIDENT COMMANDER व तहसिलदार व पोलीस विभाग यांची राहील. तसेच सर्व आस्‍थापना यांनी कोरोना संक्रमण साखळी तोडण्‍याकरिता त्रिसुत्री पद्धतीची अंमलबजावणी करावी. हे आदेश दि.7 जूनचे सकाळी  सात  वाजेपासून ते पुढील आदेशापर्यंत लागू राहील.    आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तिंविरुद्ध  कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Previous Post

तेल्हाऱ्यात २८ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या, मृतकाजवळ सापडली सुसाईड नोट

Next Post

Akola Corona Cases: आज 115 पॉझिटीव्ह, 410 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
कोरोनानंतर आरोग्यविमा घेत असाल तर हे नक्की वाचा ..

Akola Corona Cases: आज 115 पॉझिटीव्ह, 410 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू

corona vaccine

कोव्हीशिल्ड की कोव्हॅक्सिन? कोरोना विषाणूविरूद्ध कोणती लस अधिक प्रभावी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.