तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा येथिल शिवाजी चौकातील रहिवासी असलेल्या २८ वर्षीय युवकाने आज ६ जून रोजी सकाळी ८ वाजेपूर्वी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस कसून चॉकशी करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून तेल्हारा पोलीस स्टेशन येथे हत्या आत्महत्या सारखे प्रकरण घडत असून आज पुन्हा शहरातील शिवाजी चौक येथे राहणाऱ्या युवकाने गळफास घेतली, याप्रकरणी सदर मृतकांच्या मावसभावाने तेल्हारा पोलीसांत माहिती दीली असून पोलीसांनी कलम १७४ सीआरपीसी नूसार अकस्मात मृत्युची नोंद घेतली आहे तेल्हारा येथील शीवाजी चौकातील रहीवाशी नामे वीशाल(विक्की) मोतीराम मलीये २८ वर्ष या तरूनाने दी ६ जून रोजी सकाळी ८ वाजेपूर्वी राहते घरात नाटीला वायरच्या सहाय्याने गळफास घेतल्याने त्याचा त्याचा मृत्यु झाल्याची माहीती मृतकाचा मावस भाउ रीतेश धरमसींग बलोदे रा. शिवाजी चौक तेल्हारा, याने तेल्हारा पोलीसांना दील्यावरून पोलीसांनी सकाळी ९.३० वा अकस्मात मृत्युची नोंद घेउन घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासाकरीता तेल्हार्याच्या शासकीय ग्रामीण रूग्णालयातील शवविच्छेदनास पाठवीण्यात आला होता पो.नी नीतीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गणेश कायंदे ,हेड कांस्टेबल सुरेश काळे या प्रकरणी पुढील तपास करीत आहे.
मृतकाजवळ सापडली सुसाईड नोट
शहरातील शिवाजी चौक येथिल विशाल (विक्की) मलीये नामक युवकाने गळफास घेण्या पूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती पोलिसांना सदर सुसाईड नोट घटनास्थळ पंचनामा करीत असताना मृतकाच्या खिशामध्ये सुसाईड नोट आढळली असून सुसाईड नोट मध्ये नेमके मृतकाने काय लिहले असून ठेवले आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे. याप्रकरणी तेल्हारा पोलीस कसून चौकशी करीत असून सदर आत्महत्येचे हे प्रकरण वाढण्याची शक्यता आहे.
मृतक युवक होता काही महिन्यापासून डिप्रेशन मध्ये
मिळालेल्या माहितीनुसार सदर मृतक युवक हा गेल्या काही महिन्यांपासून डिप्रेशन मध्ये होता.सदर युवक हा मोल मजुरी करीत होता तर आईचे छत्र लहानपणीच हरवले होते. हसतमुख गोड स्वभावाचा विशाल याने आत्महत्या का केली याबाबत शहरवासीयांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे आत्महत्या मागचे नेमके कारण काय आणि आत्महत्या का केली हे पोलीस तपासात निष्पन्न होईलच.