• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, May 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेबपोर्टलचे अनावरण

Team by Team
September 25, 2021
in Featured, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
83 0
0
औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेबपोर्टलचे अनावरण
13
SHARES
596
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई – महाराष्ट्र शासनाने औद्योगिक उत्पादनाचे निर्देशांक राज्यासाठी तयार करण्याचे ठरविले असून त्यासाठीच्या वेब पोर्टलचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना. अजित पवार यांच्याहस्ते मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्ष सभागृहात ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाले.

याप्रसंगी उद्योग मंत्री ना.श्री सुभाष देसाई, उद्योग राज्य मंत्री ना. श्रीमती आदिती तटकरे ऑनलाईन उपस्थिती होते. या उद्घाटन समारंभास अपर मुख्य सचिव (नियोजन विभाग) देबाशिष चक्रवर्ती, अपर मुख्य सचिव (उद्योग विभाग) श्री. बलदेव सिंह, संचालक (अर्थ व सांख्यिकी संचालनालय) श्री. र.र. शिंगे, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी, अर्थ व सांख्यिकी संचालनालय व उद्योग संचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

राज्यांनी औद्योगिक उत्पादन निर्देशांक परिगणित करावा अशी राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाची शिफारस आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अर्थ व सांख्यिकी संचालनालय औद्योगिक उत्पादन निर्देशांक परिगणित करणार असून अर्थ व सांख्यिकी संचालनालय आणि उद्योग संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक परिगणना करण्यासाठी वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे.

या प्रकल्पामुळे भविष्यात उद्योग विषयक महत्वाच्या आकडेवारीची उपलब्धता होईल. राज्याच्या औद्योगिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे,राज्याचे औद्योगिक धोरण निश्चित करणे,औद्योगिक विकासाच्या योजना ठरविणेयासाठी ‍औद्योगिक क्षेत्रातील चढ उताराचे मोजमापण्यासाठी या वेब पोर्टलचा निश्चित उपयोग होईल, असा विश्वास उद्योगमंत्री मा.ना. श्री. सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र हे देशात अग्रेसर राज्य असून देशाच्या एकूण सकल उत्पन्नामध्ये (GDP) राज्याचा जवळपास 14 टक्के इतका वाटा तर देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात राज्याचा जवळपास 15 टक्के इतका वाटा आहे. औद्योगिक प्रगतीचे मापन औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने करता येते. देशाच्या उत्पादन वाढीचा वेग, राज्या-राज्यातील उत्पादन वाढीची तुलना करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. या निर्देशांकामुळे राज्यातल्या औद्योगिक क्षेत्राच्या वाढीचा कल विचारात घेऊन राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी राज्याचे उद्योग धोरण ठरविणे, ते प्रभावीपणे राबवणे, तसेच धोरणांचा नियमित आढावा घेण्यासाठी या पोर्टलचा निश्चित उपयोग होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्रीना श्री. अजित पवार यांनी वेब पोर्टलच्या अनावरण प्रसंगी व्यक्त केला. गेल्या सव्वा वर्षाच्या कोरोना विषाणू संक्रमणाचा संपुर्ण जग, देश तसेच राज्य लढाई करीत आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्याने कडक निर्बंध लादले आहेत. यामुळे उद्योग तसेच व्यापार क्षेत्रावर याचा परिणाम झाला असून अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. उद्योग क्षेत्रावर झालेला व होणारा परिणाम विचारात घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सदर निर्देशांकाचा उपयोग होणार आहे.

निवडलेल्या कारखान्यांकडून प्रत्येक महिन्यात त्यांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाची माहिती निर्धारित वेळेत प्राप्त करुन त्याद्वारे राज्याचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक प्रत्येक महिन्यात परिगणित करावयाचा आहे. त्यामुळे दर महिन्याला माहिती प्राप्त करून घेण्याची जबाबदारी सोपविलेल्या जिल्हास्तरावरील उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देउन ती दर महिन्याच्या 5 तारखेस वेब पोर्टलवर नोंदविली जाईल याची दक्षता घ्यावी, अशी सूचना मा. उपमुख्यमंत्री यांनी केली व उपक्रमास शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले तर संचालक र.र.शिंगे यांनी प्रास्ताविक केले.

Tags: web portal for industrial production indexesऔद्योगिक उत्पादन निर्देशांक
Previous Post

अकोला : कोविड चाचणीसाठी मोफत बस उपलब्ध

Next Post

Akola Corona Cases: 489 पॉझिटीव्ह, सहा मृत्यू ,403 डिस्चार्ज

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
corona covid 19

Akola Corona Cases: 489 पॉझिटीव्ह, सहा मृत्यू ,403 डिस्चार्ज

covid test

कोरोनामुळं नुकसान झाल्याचं Blood Test मधून कसं कळतं? कोणत्या टेस्ट करायच्या ...

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.