अकोला – येथील पावस ट्रॅव्हल्स या संस्थेने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आवाहनानुसार, कोविड चाचणीसाठी फिरते स्वॅब संकलन केंद्र कार्यान्वित करता यावे यासाठी त्यांच्या संस्थेची एक बस विनामूल्य उपलब्ध करुन दिली आहे. शनिवार दि.1 पासून ही बस कार्यान्वित असून सद्यस्थितीत अकोला शहरात विविध ठिकाणी जाऊन लोकांचे स्वॅब संकलन करण्यासाठी या बसची मोलाची मदत होत आहे. या बसला आज जिल्हाधिकारी पापळकर यांनी भेट दिली व बस मधील आरोग्य पथकाशी चर्चा केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच पावस ट्रॅव्हल्स चे संचालक आदी उपस्थित होते.