लग्न म्हटलं की मजा मस्ती, नात गाणं आलचं. खूप कमीवेळा लग्न शांततेत पार पाडलं जातं. लग्नांमध्ये डिजे वाजवणं काही नवीन नाही. याच डिजेमुळे जर कोणी लग्न लावून देण्यास नकार दिला तर काय होईल? होय, असाच प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तरप्रदेशच्या शामलीमधील एका मौलानानं निकाह पढण्यास नकार दिला आहे.
तुमचा विश्वास बसणार नाही पण नवरदेव लग्न लागण्याआधी डिजेच्या तालावर नाचला म्हणून या मौलवीनं लग्न लावण्यास नकार दिला. मौलाना लग्न सोडून आपल्या घरी परत गेल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांकडून त्यांची माफी मागण्यात आली. तरिही कोणताही परिणाम झाला नाही. नाईलाजानं दुसऱ्या शहारातील मैलानांना बोलवण्यात आलं आणि निकाह झाला.
वास्तविक हे प्रकरण केसराणा कोतवाली परिसरातील खेल कला येथिल आहे. येथे २१ मार्च रोजी दिल्लीच्या जगतपुरी येथील एका व्यक्तीच्या घरी दोन वराती आल्या. मिरवणूक मुलीच्या घरी पोहोचताच , मिरवणुकीसह आणलेल्या डीजेच्या तालावर नवरा मुलगा नाचू लागला. आनंदाच्या भरात नवरदेव गाडीवर चढला आणि मोठ्या उत्साहात नाचू लागला.
जेवणाचा कार्यक्रम आटपल्यानंतर उपस्थित मंडळींकडून मौलवी सुफियान यांच्याकडून निकाह करण्याची मागणी करण्यात आली होती. मौलवी सुफियांना यांनी डिजेवर नाचण्याच्या प्रकाराला विरोध करत तिथून निघून गेले. त्यानंतर रात्री ११ वाजता निकाह करण्यात आला. या प्रकारात पंचायतीत बैठक बोलावण्यात आली असून या प्रकाराची चौकशी केली जात आहे. दरम्यान या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.