अकोला – स्थानिक जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे अ. भा. कुणबी युवा मंच संघटनेच्या वतीने जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन आज दि. 2 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. सर्वप्रथम संपूर्ण महाराष्ट्रात संत तुकाराम महाराज यांची जयंती कुणबी युवा मंचच्या वतीने सुरु केली असून दरवर्षी मोठ्या स्वरूपात जयंतीचे आयोजन करण्यात येते परंतु या वर्षी करोना च्या संसर्गजन्य परिस्थिती मुळे शासनाच्या नियमावली प्रमाणे आयोजन करण्यात आले.
या आधी जयंती सोहळ्याला महाराष्ट्रातील प्रख्यात वक्ते माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके, आमदार. अमोलदादा मिटकरी, गंगाधर बनबरे, डॉ. उद्धवराव गाडेकर महाराज, माजी कुलगुरू डॉ. अरुण सावंत, ऍड. वैशाली डोळस. आदी वक्त्यांची वैचारिक मेजवानी लाभली असून या वर्षी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी समाजातील प्रतिष्ठित अरविंदजी महल्ले, तर प्रमुख उपस्थिती म्हणून रामरावजी पाटेखेडे, कुणबी युवा मंच चे आधारस्तंभ दिलीपजी सावरकर, अरुनजी वानखडे यांची उपस्थिती होती.
दिलीपजी सावरकर यांच्या हस्ते दीप प्रजवलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. संत तुकाराम महाराजांचे विचार अंगीकारून समाजातील अनिष्ट चालीरीतींना फाटा देण्याची गरज असल्याचे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंदजी महाले यांनी तर तर प्रमुख उपस्थिती लाभलेले रामरावजी पाटेखेडे यांनी संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कुणबी युवा मंचचे अध्यक्ष माणिक शेळके यांनी संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीची पार्श्वभूमी सांगून शासनाने संत तुकाराम महाराजांची जयंतीची तारीख निश्चित करावी याकरिता सर्वांनी मिळून प्रयत्न करावे असे मनोगत व्यक्त केले. याचबरोबर उपस्थितांमधून श्री मनीष गुजरकर, सुमित कोठे, नरेंद्र जकाते, राहुल घनोकार यांनी देखील आपले विचार प्रकट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री माणिक शेळके यांनी तर बहारदार व अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन प्रा. देवानंद गावंडे यांनी केले व किशोर कुचके यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला संपूर्ण जिल्ह्यातील कुणबी युवा मंच संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये बाळकृष्ण दांदळे, किशोर कुचके, राजेश्वर वाकोडे, अक्षय आखरे, अक्षय भटकर, देवानंद गावंडे, मनीष गुजरकर, प्रवीण पानपदे, मंगेश गोळे, गोपाल पाटकर, निलेश इंगळे, दत्ता वैराळे, गोपाल बेलोकार, तुषार डांगे, शिवा महल्ले, अविनाश मातळे, बाळू ढोले, अभिजित महल्ले, नरेंद्र जकाते, प्रतीक तायडे, अंकुश मुळे, आनंद गाडे, अनिल भालतीलक, शिवहरी ठाकरे, मदन मोहन अवचार, दादाराव शिवदास मते, स्वप्नील अहिर, राजेश गावंडे, दीपक निकामे, राहुल घनोकर, नितीन वर्गे, सचिन पाटेखेडे, दत्ता मानकर, दीपक आगरकर, रोशन उगले, चंद्रशेखर पुंडकर ई. मान्यवर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. सदाशिव शेळके सर, प्रा. नितीन ढोरे, श्री गजानन थोरात, इंजि. विजय ठाकरे इत्यादींनी भेटी दिल्या.