• Subscribe Whatsapp
  • Covid 19 Tracker India
  • Live Stream
Wednesday, February 24, 2021
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • फिचर्ड
    • आरोग्यपर्व
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Live Stream
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • फिचर्ड
    • आरोग्यपर्व
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Live Stream
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home फिचर्ड लेखणी

लेख- संत तुकारामांची गाथा,-सशक्त करेल बहुजनांछा माथा- भिमराव परघरमोल

Team by Team
February 3, 2021
in लेखणी, संपादकीय
1 min read
0
Tukaram maharaj
8
SHARES
424
VIEWS
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

डॉ. बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी असे म्हणतात की, संत तुकाराम महाराजांची गाथा वगळता संपूर्ण ब्राह्मणी साहित्य जरी समुद्रात बुडवले तरी मला फारसं काही दुःख होणार नाही. आणि म्हणूनच त्यांनी आपल्या ३१ जानेवारी १९२० रोजी सुरु केलेल्या मूकनायक या मुखपत्राच्या पहिल्या पानावर सर्वात वर तुकाराम महाराजांचा अभंग लिहून आपल्या मुखपत्राचे उद्दिष्ट काय आहे हे इथल्या मनुवादी, विषमतावादी, ब्राह्मणवादी व्यवस्थेला दर्शवण्याचा प्रयत्न केला.

काय करू आता ठेवूनिया भीडl
निशंक हे तोंड वाजविलेl
नव्हे जगी कोणी मुकीयाचा जानl
सार्थक लाजून नव्हे हितl
हजारो वर्षांपासून पिढ्यान्पिढ्या मुक्या असलेल्या बहुजन समाजाच्या व्यथा आणि वेदना संत तुकाराम महाराजांनी आपल्या पाच हजार अभंग गाथेच्या माध्यमातून जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. कारण भारतातील इतर धर्मग्रंथांनी बहुजन समाजाचा बोलण्याचा, लिहिण्याचा, वाचण्याचा, एवढेच नव्हे तर त्यांच्याकडे पाहण्याचाही अधिकार नाकारला होता. संत तुकाराम महाराजांनी या प्रचलित धर्मग्रंथाचे प्रामाण्य स्वतःही नाकारले आणि इतरांनाही नाकारण्यास सांगितल त्यासंदर्भात ते म्हणतात

वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावाl
ऐरांनी वाहावा भारमाथाl

म्हणजेच ज्या ठिकाणी वेदांच्या संदर्भात बहुजन समाजाला कुठलाही अधिकार नसताना, संत तुकाराम महाराज त्यांचे अध्ययन करून त्यामध्ये कोणतेही जीवनोपयोगी तत्वज्ञान नसल्याचे जाहीर करतात. महाराज फक्त धर्म ग्रंथांवर भाष्यच करत नाहीत, तर बहुजन समाजाने जीवन जगत असताना जन्मापासून तर मरणापर्यंत (मरणोत्तर नव्हे) आदर्श जीवन कसे जगावे, माणसाने माणसाशी कसे वागावे, याचे मार्गदर्शन करतात. कारण की,

बुडता हे जन न देखवे डोळाl म्हणुनी कळवळा येत असेl

आजचा बहुजन समाज अंधश्रद्धा, भटी कर्मकांड, शकुन-अपशकुन, रुढी-परंपरा, उपास-तापास, व्रत-वैकल्य, सण-समारंभ यांच्या खूप आहारी गेला आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खूप खालावत चालली आहे. महाराजांनी दारिद्र्याचे गोडवे कधीच गायीले नाही. ठेविले अनंते तैसेची रहावेl हा अभंग त्यांचा आहे की नाही हा संशोधनाचा विषय आहे. त्यासंदर्भात ते म्हणतात

जोडूनिया धन उत्तम व्यवहारेl
उदास विचारे वेचकरीl
प्रत्येकाने श्रीमंत असावे असे ते म्हणतात. परंतु कमावलेली संपत्ती ही योग्य मार्गाने जोडलेली असावी तसेच तिचा विनियोग सुद्धा योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणीच झाला पाहिजे. इतर धर्मग्रंथ मात्र सांगतात की, या जन्मी जर तुम्ही गरीब निर्धन दारिद्र्यात खितपत पडलेले असाल, शूद्र म्हणून जन्मला असाल, तर हे तुमचे पूर्वजन्मीचे पाप आहे. म्हणून या जन्मी जर पुण्य संपादन केले तर पुढील जन्मी उच्च जातीत जन्म मिळून योग्य जीवन जगायला मिळेल. पुण्य संपादन करण्यासाठी काय करावे तर देवाची भक्ती करावी, नवस बोलावे, भटजींना दान दक्षिणा द्यावी, तीर्थाटन करावे त्या संदर्भात सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात

जाऊनिया तीर्था काय तुवा केलेl
चर्म प्राक्षाळीले वरी वरीl
अंतरीचे शुद्ध कासयाने केलेl
भूषणत्वा आले आपणयाl
तुका म्हणे नाही शांति क्षमा दयाl
तोवरी कासया फुंदापरीl

तिर्थाला जाऊन पाप धूतल्या जात नाही आणि पुण्यही संपादन होत नाही. कोणत्याही पाण्याने अंघोळ केली तरी शरीराची चांबडीच शुद्ध होईल. जोपर्यंत अंतकरणात दया-क्षमा-शांती नाही तोपर्यंत जीवनात काहीच साध्य होणार नाही. त्यापेक्षा ते म्हणतात

जे का रंजले गांजलेl
त्यासी म्हणे जो आपुलेl
देव तेथेची जाणावाl
साधु तोची ओळखावाl

आजकाल समाजामध्ये मोठ्या प्रमाणात स्वयंघोषित साधु, संत, बुवा, बापू, बाप्या, अम्मा टम्माचे पेव फुटले आहे. त्यापैकी बरेच लोक तुरुंगाची हवा खात आहेत, तर काही त्या वाटेवर मार्गस्थ आहेत. संत तुकाराम महाराजांनी साधू आणि संतांना ओळखण्याची साधी आणि सोपी कसोटी सांगितली आहे. ती समजून घेण्याची गरज आहे. ज्यांच्याकडे मानवी मुल्य असतील, ज्यांना समाजाच्या प्रगतीची कळकळ असेल, ज्यांच्या कृतीमुळे व विचारांमुळे समाजाची धारणा होईल, समाजाने त्यांचा आदर करावा. त्यांनाच थारा द्यावा. आजकालच्या साधुसंतांना राहण्याची खाण्यापिण्याची अप्रतिम शाही व्यवस्था लागते. त्यांना एखादा प्रश्न विचारायचा असेल तर ऑनलाइन अपॉइंटमेंट घेऊन, लाखो रुपये फी त्यांच्या खात्यामध्ये आधीच जमा करावी लागते. एवढे करूनही एखाद्या प्रश्नाचे उत्तर हे अतिशय हास्यास्पद, पहिल्या वर्गातल्या मुलासारखे दिले जाते. एखाद्या महिलेला सांगितलं जातं की, लाल रंगाची साडी घालत असाल तर हिरव्या रंगाची घालावी. तरच आपल्या समस्येचे समाधान होईल. एखाद्या पुरुषाला सांगितले जाते गोलकप्पे खाऊ नये किंवा खायचे असतील तर हिरव्या रंगाच्या चटणी वर्ज्य करावी. काही बाबा बुवा तर हवेत हात फिरवून सोन्याची चैन, अंगठी, लाडू, राख काढतात. परंतु सोन्याची चैन अंगठी ही श्रीमंतांना, आमदार, खासदार, मंत्री यांना देतात. तर गोरगरिबांच्या हातात राख ठेवून, एकप्रकारे त्यांच्या जीवनाची राख व्हावी म्हणून आशीर्वाद देतात.

असे बाबा, बापू, स्वयंघोषित संत लोकांच्या भावनेला हात घालतात. म्हणून सर्वसामान्य जनता त्यांच्या बाह्य वर्तनाला बळी पडते. त्यापासून सावध राहण्यासाठी महाराज म्हणतात,

भगवे तरी श्वान, सहज वेश त्याचाl
तेथे अनुभवाचा काय पंथl

म्हणजेच वरवरच्या दिखाऊ व्यक्तिमत्वाला न भाळता त्यांचा अनुभव, त्यांचे आचरण, त्यांचे ज्ञान तपासले पाहिजे. महाराजांना निकोप समाजव्यवस्था अपेक्षित आहे कोणीही जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था, अस्पृश्यता, भेदाभेद पाळू नये. त्यासाठी ते म्हणतात

अवघी एकाचीच वीण
तेथे कैचे भिन्नाभिन्नl

निर्व्यसनी आणि बलशाली समाज निर्मितीसाठी सुद्धा ते म्हणतात की,

ओढनिया तंबाखू काढला जो धूर
बुडेल ते घर ते घर तेने पापेl

मानवी समाज व्यवस्थेचा एकही पैलू संत तुकाराम महाराजांनी सोडला नाही, की ज्यावर त्यांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून मार्गदर्शन तथा प्रबोधन केले नाही. म्हणून सर्व बहुजन समाजाने आपापल्या घरी भटी कर्मकांड करण्यापेक्षा प्रत्येक मंगलप्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील काही अभंगांचे पठन करावे. महाराजांच्या गाथेचे सामूहिक पारायण करावे ते करण्यासाठी कोणीही जाणकार व्यक्ती चालतो. भटजीच असेल पाहिजे असे काहीही नाही.फक्त त्यांना अर्थ तेवढा कळला पाहिजे. जेणेकरून आम्हाला जीवन जगण्याचे मार्गदर्शन होईल व ते सुसह्य वाटू लागेल. समाजामध्ये एकमेकांबद्दल जिव्हाळा, प्रेम, बंधुभाव, समता, निर्माण होऊन, जीवन खूपच सुंदर आहे, ते आनंदाने जगले पाहिजे हेही कळेल. असे झाल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा निश्चितच थांबल्या शिवाय राहणार नाहीत. कारण तुकाराम महाराज आणि त्यांची गाथा मानवी कल्याणासाठी आहे. मानवाच्या उत्थानासाठी आहे. त्यांच्याच अभंगाच्या माध्यमातून सांगायचे झाल्यास

अर्भकाच्या साठी पंते हाती धरली पाटीl
बालकाच्या चाली माता जाणुनी पाऊल घालीl
तैसे जगी संत क्रिया करूनी दावीl
तुका म्हणे नाव जनी उदकी ठावl

भिमराव परघरमोल
व्याख्याता तथा अभ्यासक
फुले-आंबेडकरी विचारधारा
तेल्हारा जि. अकोला
मो.९६०४०५६१०४

Tags: The saga of Saint Tukaram Maharajश्री संत तुकाराम महाराज
Share3Tweet2SendShare
Previous Post

हिवरखेड ला मिळणार 21 वर्षात 14 वा सरपंच!सर्वाधिक सरपंच देण्याचा किर्तीमान हिवरखेडला

Next Post

कुणबी युवा मंच तर्फे संत तुकाराम महाराज जयंती सोहळा संपन्न

Related Posts

लेख – परिवर्तनाच्या अत्युच्च टोकावरील महानायिका- जिजाऊ सावित्री- भिमराव परघरमोल
लेखणी

लेख – परिवर्तनाच्या अत्युच्च टोकावरील महानायिका- जिजाऊ सावित्री- भिमराव परघरमोल

January 12, 2021
भीमा कोरेगाव विजयस्तंभ, शौर्याची निरंतर प्रेरणा-भिमराव परघरमोल
लेखणी

भीमा कोरेगाव विजयस्तंभ, शौर्याची निरंतर प्रेरणा-भिमराव परघरमोल

January 1, 2021
बोनस, वेतनवाढ च्या हपत्या करीता वीज कर्मचारी 14 नोव्हेंबर पासून संपावर, तेल्हारा येथे कर्मचारी चे निदर्शने
लेखणी

मनुस्मृति- स्त्रियांसह बहुजनांना गुलामीत ठेवण्याचे भिक्षुकी छडयंत्र-भिमराव परघरमोल

December 25, 2020
अण्णाभाऊ साठें
Featured

अण्णाभाऊ साठेंची लेखणी, ही मुक्या वंचितांचा हुंकार-भिमराव परघरमोल

July 31, 2020
राजगृह
Featured

लेख- अस्मितांवरील हल्ले आणि विकृत मानसिकतेचा विखार !–भीमराव परघरमोल

July 10, 2020
reporters
Featured

लोकशाही च्या चौथ्या स्तंभाला तडा गेला का?  

June 23, 2020
Next Post
कुणबी युवा मंच तर्फे संत तुकाराम महाराज जयंती सोहळा संपन्न

कुणबी युवा मंच तर्फे संत तुकाराम महाराज जयंती सोहळा संपन्न

Stay Connected

  • 7.3k Fans
  • 245 Followers
  • 33k Followers
  • 2.3k Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अकोल्यात पुन्हा लॉकडाऊन जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

अकोल्यात पुन्हा लॉकडाऊन जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

February 18, 2021
तेल्हाऱ्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई,१२ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई

तेल्हाऱ्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई,१२ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई

February 18, 2021
स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका महिलेला फाशी...

स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका महिलेला फाशी…

February 18, 2021
नागपूर खंडपीठाच्या न्यायाधीशांना का बरं महिलेने पाठवले तब्बल दीडशे कंडोमची पाकिटे ?

नागपूर खंडपीठाच्या न्यायाधीशांना का बरं महिलेने पाठवले तब्बल दीडशे कंडोमची पाकिटे ?

February 19, 2021
दोन जोडप्यांच्या अनोखा विवाह सोहळा, वंदे मातरम् म्हणून विवाह संपन्न केले

दोन जोडप्यांच्या अनोखा विवाह सोहळा, वंदे मातरम् म्हणून विवाह संपन्न केले

February 24, 2021
NASA releases audio & video from Mars : नासाने शेअर केले पर्सेव्हरन्स रोव्हर लँडिंगचे विडिओ

NASA releases first audio & video from Mars : नासाने शेअर केले पर्सेव्हरन्स रोव्हर लँडिंगचे विडिओ

February 24, 2021
चुकीच्या रेल्वेमधून उतरवितांना झाला अपघात,महिलेस 7 लाख रुपये नुकसान भरपाई

चुकीच्या रेल्वेमधून उतरवितांना झाला अपघात,महिलेस 7 लाख रुपये नुकसान भरपाई

February 24, 2021
तेल्हारा विकास मंचच्या वतिने संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी

तेल्हारा विकास मंचच्या वतिने संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी

February 24, 2021

Recent News

दोन जोडप्यांच्या अनोखा विवाह सोहळा, वंदे मातरम् म्हणून विवाह संपन्न केले

दोन जोडप्यांच्या अनोखा विवाह सोहळा, वंदे मातरम् म्हणून विवाह संपन्न केले

February 24, 2021
NASA releases audio & video from Mars : नासाने शेअर केले पर्सेव्हरन्स रोव्हर लँडिंगचे विडिओ

NASA releases first audio & video from Mars : नासाने शेअर केले पर्सेव्हरन्स रोव्हर लँडिंगचे विडिओ

February 24, 2021
चुकीच्या रेल्वेमधून उतरवितांना झाला अपघात,महिलेस 7 लाख रुपये नुकसान भरपाई

चुकीच्या रेल्वेमधून उतरवितांना झाला अपघात,महिलेस 7 लाख रुपये नुकसान भरपाई

February 24, 2021
तेल्हारा विकास मंचच्या वतिने संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी

तेल्हारा विकास मंचच्या वतिने संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी

February 24, 2021
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • फिचर्ड
  • Live Stream

© 2020 Our Media Networks - Managed by Fusion Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • फिचर्ड
    • आरोग्यपर्व
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Live Stream

© 2020 Our Media Networks - Managed by Fusion Technologies.

व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/H3iGnvYN3ibEEfXIXJsTrf

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

आम्हाला सोशल मिडीया सोबत जुळा 
Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker