• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

हिवरखेड ला मिळणार 21 वर्षात 14 वा सरपंच!सर्वाधिक सरपंच देण्याचा किर्तीमान हिवरखेडला

Team by Team
February 3, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
विधान परिषदेत गाजला हिवरखेड नगरपंचायतचा मुद्दा,आ. मिटकरींनी उचलले अकोला जिल्ह्यातील अनेक विषय
12
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

हिवरखेड(धिरज बजाज) – फक्त 21 वर्षात हिवरखेड वासीयांना चक्क 14 वा सरपंच मिळणार असून नगरपंचायत प्रस्तावित असल्याने नवीन सरपंच पद सुद्धा औटघटकेचे ठरणार असल्याचे बोलले जाते.

विदर्भातील सर्वात मोठी ग्रामपंचायत हिवरखेड येथे जेवढ्या काळात चार सरपंच व्हायला हवे होते तेवढ्या काळात तब्बल चौदा सरपंच, प्रभारी सरपंच आणि एक प्रशासक हिवरखेड वासियांना आतापर्यंत मिळाले आहेत. तहसील कार्यालयात झालेल्या आरक्षण सोडतीत हिवरखेड चे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आले आहे खुला प्रवर्गातील आरक्षण जाहीर झाल्याने सर्व सदस्य गण आनंदित असून त्यापैकी बहुतांश सदस्यांना सरपंच पदाचे डोहाळे लागल्याचे दिसत आहे. आता फक्त सरपंचपद महिलेसाठी राखीव राहते की खुले राहते हे तीन फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयातील सोडतीनंतर कळणार आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

येत्या आठवड्यात नवीन सरपंच विराजमान होण्याची चिन्हे दिसत आहेत. सरपंच पदी कोण विराजमान होणार याबाबत सर्व हिवरखेड वासियांना उत्सुकता लागली असून. कोणत्याही गटा-तटाला पूर्ण बहुमत न मिळाल्याने मिळून-मिसळून खिचडी सरकार बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरपंच पदी कोणीही विराजमान झाले तरी हिवरखेड नगरपंचायत शासन दरबारी प्रस्तावित असल्याने नवीन सरपंचाचे पद औटघटकेचे राहणार असल्याचे बोलल्या जात आहे. नगरपंचायत च्या मुद्द्यावर 40,000 हिवरखेड वासी भावनात्मक रित्या जोडल्या गेले असून कोणी चुकूनही नगरपंचायत थांबविण्याचा छुपा प्रयत्न केल्यास त्यांना हिवरखेड वासियांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. आणि त्यांची प्रतिमा हिरो ते झिरो होण्यास वेळ लागणार नाही. सामान्य जनतेच्या भावनांशी खेळण्याचा काय परिणाम होतो ह्याची प्रचिती जनतेने नुकतीच मतदानातून दाखवून दिली आहे. मागील एकवीस वर्षात हिवरखेडला एकही पंचवार्षिक सरपंच मिळाले नाही याला जनतेचे सुदैव म्हणावे की दुर्दैव हेच कळत नाही.

मध्यंतरी शासनाने थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा नियम केला होता परंतु त्या काळात हिवरखेड ग्रामपंचायत निवडणूक न झाल्याने हिवरखेडच्या जनतेला थेट सरपंच निवडण्याचा मान मिळाला नाही. मागील 21 वर्षात सर्वच 13 सरपंच, प्रभारी सरपंच, प्रशासक यांनी “सबका साथ सबका विकास” ह्या तत्वावर भरपूर विकास केला. ग्रामपंचायतला विविध योजनांच्या माध्यमातून मोठा निधी मिळत असल्याने सरपंचांना “विकास” करण्यास भरपूर वाव असतो.

सरपंच पदाला अनन्य साधारण महत्त्व असल्याने आणि शक्यतो कोणालाही एक हाती बहुमत मिळत नसल्याने अनेक जणांना विकास करण्याची संधी मिळावी ह्या उदात्त हेतूने सरपंच पद आळीपाळीने, सामंजस्याने वाटून घेण्यात येते. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींजींचे ध्येय असलेले “सबका साथ सबका विकास” हे वाक्य खऱ्या अर्थाने हिवरखेड ग्रामपंचायत मध्ये साकार होताना दिसत आहे. परंतु सदर विकास गावाचा होतो की स्वतःचा हे एक न उलगडणारे कोडे असून सुजाण नागरिक आप आपल्या परीने मूल्यांकन करून त्याचा अर्थ लावत असल्याचे दिसते.

विकासाबाबत किर्तीमान होणार की नाही ह्याची कल्पना नाही पण कमी काळात सर्वाधिक सरपंच देण्याचा बहुमान हिवरखेड ला मिळण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा हिवरखेड वासी गमतीने करीत आहेत. यासाठी लिम्का बुक आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कडे प्रस्ताव पाठवावा असा मजेशीर सल्ला सुद्धा खासगीत बोलताना जागरूक नागरिक व्यक्त करीत आहेत.

Tags: सरपंचहिवरखेड ग्रामपंचायत
Previous Post

तेल्हारा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी गठीत

Next Post

लेख- संत तुकारामांची गाथा,-सशक्त करेल बहुजनांछा माथा- भिमराव परघरमोल

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Tukaram maharaj

लेख- संत तुकारामांची गाथा,-सशक्त करेल बहुजनांछा माथा- भिमराव परघरमोल

कुणबी युवा मंच तर्फे संत तुकाराम महाराज जयंती सोहळा संपन्न

कुणबी युवा मंच तर्फे संत तुकाराम महाराज जयंती सोहळा संपन्न

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.