अकोला – वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश युवा जोडो अभियान अंतर्गत अकोला जिल्हयात १ लाख युवा नोंदणी अभियान अकोला महानगर युवा नोंदणी स्टॉल स्थानिक कवर नगर येथील यशवंत भवन समोर उभारण्यात आला. सुजातजी आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन युवा आघाडी युवा नोंदणी मोहीम प्रारंभ करण्यांत आली. या नोंदणी स्टॉल मध्ये लॅप टॉप आणि मोबाईल द्वारे युवकांची वंचित बहुजन युवा आघाडी आॅनलाईन नोंदणी करण्यात आली. वंचित बहुजन युवा आघाडी नोंदणी स्टॉल चे उद्घाटन वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ते तथा युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर स्टॉल तीन दिवस कंवर नगर तर त्यानंतर विविध ठिकाणी हा स्टॉल लावला जाईल. युवकांनी आणि युवतींनी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी ची हि व्यवस्था करण्यात आली आहे. नोंदणी स्टॉल चे नियोजन निरीक्षक जय रामा तायडे यांनी केले असून नोंदणी स्टॉल उद्घाटन प्रसंगी वंचित चे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे,भारिप बहुजन महासंघ अकोला पुर्व महानगर अध्यक्ष शंकरराव इंगळे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे, विजयजी तायडे, पुरुषोत्तमजी अहिर, विकास सदांशिव,वैभव वानखडे,किसन सोळंके,शरद इंगोले, संदिप क्षीरसागर,अजय पातोडे उपस्थित होते, आज सायंकाळ पर्यंत १९७ युवकांनी स्वतः वंचित बहुजन युवा आघाडी मध्ये ऑनलाइन नोंदणी केली .
यावेळी ऍड. आकाश भगत,सुरज दामोदर या कार्यक्रमासाठी विनय खिराडे,दिनेश चांदरशेकर , आकाश लबडे, अनुराग उंदरे ,भिमराव तायडे , स्वप्नील बागडे, विक्की अंबुलकर, शिवम कवळे(SK) ,धम्म तायडे, यांनी मेहनत घेतली तर प्रामुख्याने उपस्थित अवधूत खडसे , विजय नरवडे , नितीन प्रधान,नितीन काजळे, पंकज सावळे, प्रकाश इंगळे , लवेश वरघट, अभिषेक सावंग, निखिल मस्के,सुबोध वानखडे , संतोष दाभाडे, सुधीर बिरंगणे, बादल सावदेकर अनिकेत गवई, साहिल गोपणारायन , प्रशांत वरघट , मंगेश सुरवाडे, अनिकेत वानखडे, धीरज शिरसाट, संदेश गवई, सचिन पाचपोर ,रतन ताजने, अजिंक्य चांदरशेकर, रणवीर प्रधान, दादू गुळडे , वैभव राऊत , गोलू शिरसाट, अक्षय गाठे, सागर कांबळे, दादू सावळे, यश सावळे, सागर पातोडे, शिवा गायकवाड , शुभम धुरदेव, खोंडू गोलू शिरसाट, रोशन बागडे , आदित्य उमाले, योगेश लोखंडे, दुर्गेश सुतार, सुरज हिवराळे, ओम खडसे, सुरज जाधव, सचिन हिवराळे इत्यादी युवकांनी या उपक्रमात सहभाग घेतला.