उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील बरेली येथील इजतनगर पोलिस ठाण्यात पती-पत्नीच्या वादाचे एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. लग्नाच्या २ वर्षानंतर जेव्हा पत्नीने मुलाला जन्म दिला, तेव्हा पतीने नवजात बालकाला आपले नाव देण्यास नकार दिला. पतीने पत्नीच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केला असून लग्नानंतर तिच्याशी माझे शारीरिक संबध आले नव्हते असे मग पत्नीला मूल कसे झाले असा गंभीर आरोप केला आहे.
पतीने म्हटले आहे की, पत्नीसमवेत मी शारीरिक संबंध ठेवलेले नाहीत. मग माझी पत्नी गरोदर कशी राहिली. त्यामुळे तिने जन्म दिलेले मूल माझे कसे असेल असा सवाल उपस्थित केला आहे. ही बातमी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
लग्नाच्या २ वर्षानंतर आई बनलेल्या या महिलेने पतीने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. पत्नी म्हणते की, कमी हुंडा दिल्यामुळे सासरचे लोक मला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे ते माझ्या चारित्र्यावर संशय घेत आहेत. माझ्यावर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत. दरम्यान, पत्नीने पती आणि तिच्या कुटुंबियांविरोधात हुंडा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पत्नीने तिच्या सासरच्यांवर आरोप करत सांगितले की, लग्नानंतर दोन दिवसांपर्यंत पतीने तिच्याशी सासरमध्ये संबंध ठेवले नव्हते. त्यांनतर सासरच्यांनी माझ्या घरच्यांनी कमी हुंडा दिल्याच्या कारणावरून माझा छळ सुरू केला. नंतर कळले की, माझ्या सासरच्यांनी माझ्या नवऱ्याला संपत्तीतून बेदखल केले आहे. यानंतर, मी आणि माझे पती एक खोली भाड्याने घेऊन एकत्र राहू लागलो.
सासरच्या घरातून वेगळे राहूनही माझ्यावरील अत्याचार कमी झाले नाहीत. नवरा अनेकदा मद्यपान करून घरी यायचा आणि मला मारहाण करायचा. मग मी जेव्हा गरोदर राहिले, तेव्हा माझा नवरा मला सोडून गेला आणि त्याने माझ्यावर खोटे आरोप करण्यास सुरवात केली, असा आरोप पत्नीने केला आहे.
पीडित महिलेने सांगितले की, मी अनेकदा सासरच्या घरी गेले आणि पती आणि तिच्या सासरच्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की हे त्यांचं मुल आहे. पण ते त्यांनी मान्य केले नाही. यानंतर पीडित मी बरेलीतील इजतनगर पोलिस ठाण्यात जाऊन नवरा आणि त्याच्या कुटुंबीयांविरुध्द हुंडा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.