अकोला – कोविड 19 च्या प्रादुर्भावा मुळे रक्त संकलन कमी झाल्यामुळे महाराष्ट्रात अभूतपूर्व असा रक्ताचा तुटवडा पडला, अगदी 2 ते 3 दिवस पुरेल एवढाच रक्त साठा उपलब्ध असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी जाहीर करून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री ह्यांनी रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदान करण्याचे आवाहन केले होते, त्या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद देऊन शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार व त्यांचे कुटुंबीय ह्यांनी आज शहर वाहतूक शाखेच्या प्रांगणात रक्त दान शिबिराचे आयोजन केले होते, कदाचित शासनाने आवाहन केल्या नंतर त्याला तातडीने प्रतिसाद देऊन पोलिसांनी आयोजित केलेले हे महाराष्ट्रातील पहिलेच रक्तदान शिबिर असावे, सदर रक्तदान शिबिराचे उदघाटन अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे हस्ते झाले ह्या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या ह्या वेळी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्या मागची भूमिका विशद करून पोलीस हा घटक समाजा प्रति संवेदनशील असून दिवसरात्र त्या साठी कार्यरत तर आहेच पण वेळ प्रसंगी रक्तदान सारखे श्रेष्ठ दान करण्यासाठी सुद्धा तत्पर आहे.
पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांनी पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे कौतुक करून वाहतूक शाखा नेहमी समाज उपयोगी व समाजाचे हिताचे उपक्रम नेहमी राबवित असते, त्यांनी राबविलेल्या नो मास्क नो सवारी ह्या उपक्रमाचे मा मुख्यमंत्री व मा गृहमंत्री ह्यांनी कौतुक करून सर्व महाराष्ट्रात राबविले तसेच शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्यांनी सुरू केलेला रक्तदान शिबिराचा उपक्रम सुद्धा कौतुकास पात्र ठरतो, असा उपक्रम सर्व जिल्ह्यात राबविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले, सदर शिबिर दुपारी 12 ते 4।00 वा पर्यंत आयोजित करण्यात आले होते व विशेष बाब म्हणजे आज शहरात बंदोबस्त असतानाही वाहतूक कर्मचाऱ्यांनी सदर बंदोबस्तात कोणतीही कमतरता न ठेवता जवळपास 40 कर्मचार्यांनी व त्यांचे कुटुंबीयांनी उस्फुर्त पणे रक्तदान करून एक चांगला संदेश समाजाला दिला, सदर रक्तदान शिबिरामध्ये सर्वोपचार रुग्णालयाच्या रक्त पेढी च्या समन्वयक शिल्पा तायडे , डॉक्टर डोझी व त्यांची चमू सहभागी झाली होती।