तेल्हारा – दिल्लीमध्ये सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन पाकिस्थानी,खलीस्थानी आहे असे बेताल वक्तव्य करणारे भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांच्या निषेधार्थ तेल्हारा शिवसेना युवासेना च्या वतीने गाढव धिंड काढून निषेध व्यक्त करण्यात आला. स्थानिक टॉवर ते संत तुकाराम महाराज चौक मार्गाने दानवेची प्रतिकात्मक गाढव धिंड काढण्यात आली .त्याच बरोबर केंद्र सरकार च्या पेट्रोल , डिझेल ,गॅस दरवाढी च्या निषेधार्थ घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला.
पेट्रोल डिझेल गॅस यांचे दिवसांदिवस भाव वाढतच असून सर्व सामन्य नागरिकांची लूट होत आहे. केंद्र सरकार सामान्य नागरिकांच्या जीवावर उठले आहे .केंद्र सरकारच्या विरोधात शिवसेना प्रखर विरोध करून आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतड्याला हारपर्ण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली , त्यानंतर टॉवर चौक येथे दानवेंच्या प्रतिकात्मक गाढवाची धिंड काढून निषेध करण्यात आला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख विजय मोहोड, शिवसेना शहर प्रमुख विक्रांत शिंदे जि. प. सदस्य संजय अढाऊ, माजी शहर प्रमुख पप्पूसेठ सोनटक्के, राजेश वानखडे ,जिल्हा प्रवक्ते सचिन थाटे, रामा फाटकर, अजय गावंडे , पंकज कवर ,प्रज्वल मोहोड , संजय जयस्वाल,विवेक खारोडे, गजानन मोरखडे, प्रकाश देशमुख,दिलीप पिवाल, गौरव देशमुख, किशोर डांबरे, आदेश महल्ले,मयूर सुगंधी अमित घोडेस्वार अंकुश सपकाळ ,सागर मते, प्रसाद देशमुख मयीर सुगंधी रहेमान शाह, अमर ठाकूर, अंकुश आठवले संभाजी वानखडे आसरे, सोनोने,डामारे ,धनराज सोनोने, ओमप्रकाश चंदेरी सुपेश वानखडे ,इत्यादि शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते